Career In Paint Technology : रंगांच्या दुनियेत उजळून निघेल करिअर; ‘पेंट टेक्नॉलॉजी’मध्ये नोकरीच्या संधी; पगारही भरघोस

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । तुम्हाला अनोख्या क्षेत्रात करिअर (Career In Paint Technology) करायचे असेल तर आज आम्ही तुम्हाला एका नाविन्यपूर्ण क्षेत्राची ओळख करुन देणार आहोत. हे क्षेत्र आहे ‘पेंट टेक्नॉलॉजी’…. यामध्ये तुम्हाला रंगांचा शास्त्रशुद्ध अभ्यास कसा करायचा हे  शिकता येतं. अनेक व्यवसायांमध्ये या तंत्राचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे. रंग जरी आपल्याला आकर्षित करत असले तरी अनेक वेळा त्यांचा उपयोग एखाद्या गोष्टीचं संरक्षण करण्यासाठी देखील केला जातो. खासकरून लोखंडी वस्तू गंजू नयेत, वातावरणाचा परिणाम वस्तूवर होऊ नये व वस्तू बऱ्याच काळापर्यंत टिकून राहाव्यात यासाठी मोठ्या प्रमाणावर रंगांचा उपयोग होतो. मात्र या अभ्यासक्रमांविषयी फारच थोड्या लोकांना ज्ञान असते. या लेखात आपण ‘पेंट टेक्नॉलॉजी’मधील करिअर विषयी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत…
पेंट टेक्नॉलॉजी म्हणजे नेमकं काय?
पेंट टेक्नॉलॉजी ही केमिकल टेक्नॉलॉजी शाखेची उप-शाखा आहे. केमिकल इंजिनीअरिंगशी संबंधित असणार्‍या या क्षेत्रामधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध असून, भारतामधील काही मोजक्याच पण नामांकित संस्थांमध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

कोणकोणत्या गोष्टी शिकता येतात (Career In Paint Technology)
1. पेंट टेक्नॉलॉजीमध्ये पेंट तयार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या विविध घटकांचा आणि पद्धतींचा अभ्यास केला जातो.
2. पेंटमध्ये जाणार्‍या प्रत्येक घटकाच्या कार्यांचे रसायनशास्त्र आणि पेंट ज्या ठिकाणी किंवा ज्या पृष्ठभागावर लावला जाणार आहे त्यावर पेंटचा होणारा परिणाम समजून घेण्यासाठी Paint Technologist / Pain Expert आणि त्यानुसार बादल करण्याचे तंत्र या अभ्यासक्रमात शिकवले जाते.
3. विविध प्रकारच्या पेंट्सची निर्मिती, त्यांचा अभ्यास, साठवण्याची पद्धत याविषयी सखोल ज्ञान या अभ्यासक्रमांमधून दिले जाते. यामध्ये पुढील गोष्टी शिकता येतात.

  • Composition Characterization and Production of Lipids (लिपिडचे रचना वैशिष्ट्य आणि उत्पादन)
  • Oil Characterization (तेलाचे वैशिष्ट्य)
  • Expression and Extraction Techniques of Oil Bearing Materials (ऑइल बेअरिंग मटेरियलची एक्सप्रेशन आणि एक्सट्रॅक्शन टेक्निक्स)
  • Process Economics, Utilities and by- products of Oil Industry (प्रक्रिया अर्थशास्त्र, उपयुक्तता आणि तेल उद्योगाची उप-उत्पादने.)
  • Refining of oils (तेल शुद्धीकरण)
  • Hydrogenation and Modification of oils (हायड्रोजनेशन आणि तेलांचे बदल)

तुमच्याकडे ही शैक्षणिक पात्रता असायला हवी
1. पेंट टेक्नॉलॉजीमध्ये B.Tech अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी उमेदवाराने किमान १० + २ किंवा विज्ञान विषयासह समतुल्य शिक्षण पूर्ण केलेले असणे आवशयक आहे.
2. B.Tech नंतर तुम्ही M.Tech ची निवड करू शकता.
3. बहुतेक संस्थांद्वारे केमिकल इंजिनिअरिंग च्या अभ्यासक्रमांमध्ये या विषयाचे समावेश करून घेण्यात आला आहे.
ही कौशल्ये शिकता येतात
पेंट टेक्नॉलॉजी शिकणार्‍या विद्यार्थ्यांना ऑइल (oils), resins, पॉलिमर (polymers), pigments and dyes, organic solvents, paint additives, powder coatings, high solids coating, electro – coatings and other paint application techniques अशा विविध गोष्टी आणि तंत्राचे ज्ञान मिळते.

इथे आहे काम करण्याची संधी
1. पेंट उद्योग हे एक भरभराटीचे क्षेत्र आहे जे प्रामुख्याने ऑटोमोबाईल आणि रिअल इस्टेट उद्योगावर अवलंबून आहे.
2. त्यामुळे अशा उद्योजकीय डोमेनमध्ये पेंट टेक्नॉलॉजिस्ट आवश्यक आहे.
3. शिवाय, विविध पेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांमध्ये (Career In Paint Technology) संशोधन आणि विकास, गुणवत्ता तपासणी, उत्पादन, विपणन आणि क्लायंट साइटवर काम करणारे तांत्रिक सहाय्यक/कार्यकारी म्हणून कामाची संधी मिळू शकते.

इतका मिळणार पगार
1. या क्षेत्रातील पगार तुमच्यातील कौशल्य आणि या क्षेत्रातील अनुभवावर अवलंबून असतो.
2. या क्षेत्रात कामाची सुरवात करणार्‍याला सव्वा ते २ लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. जर एखाद्याला नामांकित ब्रँडमध्ये नोकरी मिळाली तर पगाराचा हा आकडा मोठा सू शकतो.
3. अनुभव मिळाल्यानंतर पगार चांगला मिळतो शिवाय,वरिष्ठ पातळीवर काम करण्याची संधीही मिळते.
येथे घेवू शकता शिक्षण (Career In Paint Technology)
1. बी.टेक. पेंट टेक्नॉलॉजी : इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT)
2. डिप्लोमा इन पेंट अ‍ॅप्लिकेशन टेक्नॉलॉजी : गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट
3. एम.टेक. पेंट टेक्नॉलॉजी : लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर
4. पेंट आणि वार्निश तंत्रज्ञान: औद्योगिक संशोधन प्रयोगशाळा, कोलकाता
5. बी.टेक. पृष्ठभाग कोटिंग तंत्रज्ञान- लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, नागपूर
6. एम.टेक. सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी- इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई (महाराष्ट्र)
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com