Career in Google : फ्रेशर्ससाठी Google चा off Campus Drive; असं असेल जॉब प्रोफाईल

करिअरनामा ऑनलाईन । Google सोबत काम करण्याची इच्छा (Career in Google) असणाऱ्या तरुणांसाठी एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. Googleने 2023 वर्षासाठी ऑफ-कॅम्पस इम्प्लॉयमेंटची घोषणा केली आहे. यामधून ‘क्लाउड इंजिनीअर’ पदासाठी भरती केली जाणार आहे. या पदावर काम करताना उमेदवाराला विविध टेक्नॉलॉजी बिझनेस स्ट्रॅटर्जी तयार करणं आणि त्यांची अंमलबजावणी करणं तसेच ग्राहकांना विश्वासू सल्लागार म्हणून सेवा देणं आणि त्यांना Google क्लाउडवरून जास्तीत जास्त व्यावसायिक लाभ मिळवून देण्यात मदत करणं ही महत्वाची जबाबदारी पार पाडावी लागणार आहे.
गुगल क्लाउड सर्वांत प्रगत पायाभूत सुविधा, प्लॅटफॉर्म, इंडस्ट्री सोल्युशन्स आणि ज्ञान प्रदान करून गुगल क्लाउड बिझनेसेसना त्यांच्या ऑपरेशन्समध्ये डिजिटल बदल (Career in Google) करण्याची क्षमता वाढवण्यास मदत करते. ते एंटरप्राइझ-ग्रेड सोल्युशन्स पुरवतात, जे गुगलच्या अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करतात. 200 हून अधिक देश आणि प्रदेशांमधील ग्राहक गुगल क्लाउडकडे त्यांचा विश्वासार्ह पार्टनर म्हणून पाहतात. त्यांच्या वाढीस मदत करण्यासाठी आणि त्यांच्या सर्वांत महत्त्वाच्या बिझनेस आव्हानांवर उपाय शोधण्यात कंपनी मदत करते.

असं असेल जॉब प्रोफाईल – (Career in Google)
सेल्स टीमला असिस्ट करून ग्राहकांसंदर्भातील त्यांच्या क्रिटिकल टेक्निकल प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करणं, प्रॉडक्ट मार्केटिंग मॅनेजमेंट आणि इंजिनीअरिंग टीमशी संवाद साधून इंडस्ट्रीतील लेटेस्ट डेव्हलपमेंट्सच्या माध्यमातून गुगल क्लाउड प्रॉडक्ट्समध्ये सुधारणा करण्याचं काम इंजिनीअरना करावं लागेल.

या कामाचा अनुभव आवश्यक –
1. कम्प्युटर सायन्समध्ये बॅचलर पदवी, किंवा कम्युटिंगशी रिलेटेड दुसरी टेक्निकल शाखा किंवा त्याच्या समतुल्य इतर कामाचा अनुभव.
2. बिग डेटा, प्लॅटफॉर्म-ए-ए-सर्व्हिस (PaaS) आणि इन्फ्रास्ट्रक्चर-एज-ए-सर्व्हिस (IaaS) टेक्नॉलॉजी यांचा समावेश असलेला क्लाउड कॉम्प्युटिंग अनुभव आवश्यक.(Career in Google)
3. टेक्निकल प्रेझेंटेशन व जनरल प्रेझेंटेशन करता यायला हवं.
4.  क्लाउड कॉम्प्युटिंग वातावरणात टेक्निकल सेल्स इंजिनीअर म्हणून काम करण्याचा अनुभव.
5. राउटिंग, व्हीपीएन, लोड बॅलन्सर आणि फायरवॉल यासह कॉम्प्युट इन्स्फ्रास्ट्रक्चर व नेटवर्किंग कॉन्सेप्ट्सचा अनुभव.
6. डेटा आणि इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटचा अनुभव. कारण ते डेटा ट्रेंड आणि बिझनेस आव्हानांशी संबंधित आहे.
7. डेटाबेस वापरण्याचा किंवा मॅनेज करण्याचा अनुभव.
8. क्लाउड/आयटी टेक्नॉलॉजी क्षेत्रात नवीन उदयोन्मुख टेक्नॉलॉजी, मेथडॉलॉजी व उपाय जाणून घेण्याची आणि काम करण्याची क्षमता.

ही जबाबदारी पार पाडावी लागेल –
1. टेक्निकल दृष्टीकोनातून संभाव्यतेची तपासणी करण्यासाठी आणि संधी शोधण्यासाठी अकाउंट एक्झिक्युटिव्हना मदत करणं. कोणत्याही टेक्निकल अडथळ्यांचं निराकरण करण्यासाठी आणि कोणत्याही मायग्रेशन टास्कची व्याप्ती निश्चित करण्यासाठी प्लॅन तयार करणं.
2. ग्राहक आणि पार्टनर यांच्या संदर्भांमध्ये (Career in Google) एकात्मता विकसित करण्यासाठी आणि प्रदर्शित करण्यासाठी गुगल क्लाउडमधील उपाय वापरणं.
3. व्हाइटबोर्ड आणि स्लाइड प्रेझेंटेशन, प्रॉडक्ट डेमो, व्हाइट पेपर्स, ट्रायल मॅनेजमेंट आणि डॉक्युमेंट डिलिव्हरी यासारख्या युक्त्या वापरून गुगल क्लाउडची व्हॅल्यू दर्शवण्यासाठी प्रॉडक्ट तयार करून वितरित करणं.
4. सोल्युशन्सच्या टेक्निकल घटकांसाठी जबाबदार म्हणून काम करताना प्रॉडक्ट आणि सोल्युशन ब्रीफिंग्ज मॅनेज करणं, प्रूफ ऑफ कन्सेप्ट वर्क तसंच टेक्निकल कर्मचाऱ्यांना सपोर्ट करून समन्वय साधणं.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com