Career in Engineering : इंजिनिअरिंगमध्ये कोणता ट्रेंड आहे टॉपवर? उत्तम करिअरसाठी कोणते क्षेत्र निवडाल? जाणून घ्या…

करिअरनामा ऑनलाईन । सायन्स क्षेत्रातील बहुतेक (Career in Engineering) विद्यार्थ्यांना BE किंवा B.Tech करण्याची अपेक्षा असते. यासाठी ते आधीच प्रवेश परीक्षेची तयारी सुरू करतात. प्रवेश परीक्षा दिल्यानंतर, प्रवेशादरम्यान विद्यार्थ्यांच्या मनात पहिला प्रश्न येतो की कोणते क्षेत्र निवडायचे, जेणेकरून त्यांना भविष्यात उत्तम नोकरी आणि भरघोस पगाराचे पॅकेज मिळू शकते.
इंजिनीअरिंगचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच्या मनात हा प्रश्न सतत फिरत असतो; की आजच्या काळात कोणता ट्रेंड टॉपवर आहे? कोणत्या क्षेत्रात अभियांत्रिकी करण्याचा अधिक फायदा आहे? जर तुम्हाला चांगले पैसे कमवायचे असतील तर तुम्ही कोणते क्षेत्र निवडावे; हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

1. स्थापत्य अभियांत्रिकी (Architectural Engineering)
स्थापत्य अभियांत्रिकी हे एक असे क्षेत्र आहे जे सुरुवातीपासून खूप लोकप्रिय आहे. यामध्ये नेहमीच रोजगाराची हमी असते, कारण देशातील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करत असते आणि दरवर्षी कोट्यवधी रुपये त्यावर खर्च केले जातात. याशिवाय खेड्यांपासून शहरांपर्यंत सतत बांधकामे सुरू असतात त्यामुळे या क्षेत्रात कधीही नोकऱ्या आणि पैशांची कमतरता असू शकत नाही.

2. रासायनिक अभियंता (Chemical Engineer)
रासायनिक अभियंते हे रसायने, इंधन, औषधे, अन्न आणि इतर उत्पादनांच्या उत्पादन किंवा वापराशी संबंधित समस्या सोडवतात. या क्षेत्रातील व्यावसायिकांनाही चांगली मागणी आहे.

3. बायोमेडिकल अभियंता (Biomedical Engineer) (Career in Engineering)
वैद्यकीय उद्योगात, उपकरणे, संगणक प्रणाली, सॉफ्टवेअर डिझाइन या गोष्टी विकसित करणे ही बायोमेडिकल अभियंत्यांची जबाबदारी आहे. या क्षेत्रात, बायोमेडिकल अभियंत्यांच्या संशोधन आणि कार्याशी संबंधित परिणाम लोकांशी सामायिक केले जातात. अलीकडच्या काळात या क्षेत्रात खूप वाढ झाली आहे आणि इथे व्यावसायिकांची मागणी झपाट्याने वाढली आहे.

4. एरोस्पेस अभियंता (Aerospace Engineer)
एरोस्पेस अभियंते विमान आणि स्पेसशिपच्या विकास आणि देखभालमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. अवकाश तंत्रज्ञानाकडे लोकांचा कल झपाट्याने वाढला आहे. या क्षेत्रातही चांगले करिअर पर्याय आणि पैसे कमावण्याच्या संधी आहेत.

5. संगणक शास्त्र (Computer Science)
संगणक विज्ञान हा सध्याच्या युगातच नव्हे तर बर्याच काळापासून (Career in Engineering) विद्यार्थ्यांमध्ये सर्वात लोकप्रिय ट्रेंड आहे. बीटेक करणाऱ्या बहुतांश तरुणांची सीएस (Cs) ही पहिली पसंती आहे. पदवी मिळताच तुम्हाला नोकरी तर मिळतेच पण चांगले पॅकेजही मिळते. याशिवाय परदेशातही कामाच्या संधी उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com