करिअरनामा ऑनलाईन । माणसाचं जगणं सोपं व्हावं असा AI तंत्रज्ञानाचा (Artificial Intelligence) उद्देश आहे. AI मधून मिळालेली माहिती आपल्याला एखादा निर्णय घेण्यास मदत करते, तसेच कामाचा व्याप कमी झाल्याने मोठ्या प्रमाणात वेळेची बचत करता येते. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे नेमकं काय? एवढे दिवस माणसाकरवी केल्या जाणाऱ्या गोष्टी आता कम्प्युटर करत आहे. किंबहुना माणसापेक्षा AI जास्ती चांगल्या प्रकारे डेटाचा वापर करू शकतो. आत्तापर्यंत मनुष्य जे निर्णय स्वतः घ्यायचा, किंवा ज्या प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधायचा आज त्या कामांसाठी कॉम्प्युटरचा वापर केला जातोय. AI च्या वाढत्या वापराबरोबरच इथे असणाऱ्या करिअरच्या संधी देखील वाढत आहेत. तर काय आहेत या उपलब्ध संधी जाणून घेण्यासाठी नक्की वाचा…
असं म्हणतात की AIच्या वापरामुळे अशक्य गोष्टी देखील शक्य होत आहेत. पण खरोखरच AI हे आपल्यासाठी उत्तम करिअर आहे का?
हे एक नवखं क्षेत्र असल्यामुळे जास्ती लोकं करियरच्या दृष्टीने याचा विचार करत नाहीत. त्यामुळे संधी जरी उपलब्ध असल्या तरीदेखील ‘टॅलेंट गॅप’ पाहायला मिळते. येणाऱ्या (Artificial Intelligence) काही काळात AI क्षेत्रात अजून जास्त प्रगती होण्याची देखील शक्यता आहे. इथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणारा मोबदला देखील मुबलक असतो. त्यामुळे नवीन काहीतरी करू पाहणाऱ्या मुलांनी AI चा विचार नक्की करावा.
AI मध्ये खालील प्रकारच्या संधी उपलब्ध आहेत –
१) मशीन लर्निंग इंजिनियर
२) डेटा सायंटिस्ट
३) बिझनेस इंटेलिजन्स डेव्हलपर
४) रिसर्च सायंटिस्ट
५) डेटा आर्किटेक्ट
६) सॉफ्टवेअर इंजिनियर
७) सॉफ्टवेअर आर्किटेक्ट
८) डेटा एनालिस्ट
९) रोबोटिक्स इंजिनियर
१०) बिग डेटा इंजिनियर
AI इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी कोणते शिक्षण घ्याल?
डेटा सायन्स, कम्प्युटर सायन्स किंवा आयटी यामधून तुम्ही बारावीनंतर बॅचलरची डिग्री मिळवू शकता. यापुढे मॅथेमॅटिक्स, कॉग्नेटिव्ह सायन्स, कम्प्युटर सायन्स किंवा डेटा सायन्स मधून मास्टर्सची डिग्री मिळवली जाऊ शकते. या व्यतिरिक्त काही सर्टिफिकेट कोर्सेस देखील उपलब्ध आहेत.
भारतात काही शैक्षणिक संस्था आहेत ज्या AI क्षेत्रातील डिग्री देण्याचे काम करतात.
कोर्स कुठे कराल? (AI Institutes)
१) मणिपाल अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन, मणिपाल.
२) व्हीआयपी भोपाल यूनिवर्सिटी (Artificial Intelligence)
३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च भोपाल
४) गुजरात युनिव्हर्सिटी, अहमदाबाद.
५) कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, कोची
६) श्रीरामचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च, चेन्नई
७) जैन युनिव्हर्सिटी, बेंगलोर
८) चंदीगड युनिव्हर्सिटी
काय असतो AI कर्मचाऱ्यांचा पगार? (Salary)
AI मध्ये नवीनच रुजू झालेल्या कर्मचाऱ्याला 6,00,000 रुपये पगार मिळू शकतो तर मोठाल्या कंपन्या जसे की गुगल, अमेझॉन, फ्लिपकार्ट कडून 12,00,000 एवढ्या पगाराची अपेक्षा केली जाऊ शकते. त्यानंतर कामातून मिळणारा अनुभव, स्वतःवर घेतलेली मेहनत, आणि वाढवलेला स्किल सेट यामुळे दोन ते चार वर्ष AI इंडस्ट्री मध्ये काम करणारा माणूस 7 ते 20 लाख रुपये नक्कीच कमवू शकतो. यापुढेही नोकरीचा अनुभव असेल तर 30 ते 50 लाख किंवा 1 कोटीची रक्कम देखील कंपनीकडून देऊ केली जाते.
आतापर्यंत करिअर म्हणून विचार केलेल्या गोष्टींपेक्षा AI हे फारच वेगळं आणि नवीन क्षेत्र आहे आणि याबद्दल आपल्याला फारशी माहिती असत नाही. त्यामुळे AI हे करिअर म्हणून निवडताना आधी पुरेशी माहिती घेणं महत्त्वाचं आहे. यामध्ये तुम्हाला Programming Language, Algebra, Probability, Problem Solving Behaviour आणि उत्कृष्ट Communication Skills ची गरज असते. त्यामुळे व्यवस्थित मेहनत करत या नवीन फिल्डमध्ये देखील चांगलं करिअर घडवता येईल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com