Career After 12th : 12 वी नंतर करता येणारे कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगचे ‘टॉप 7’ कोर्स; मिळवा लाखो-कोटींत कमवण्याची संधी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जेईई ॲडव्हान्स 2024 ची परीक्षा (Career After 12th) उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे अभियांत्रिकी क्षेत्रातील सर्वात मागणी असलेला अभ्यासक्रम म्हणजे संगणक विज्ञान अभियांत्रिकीमध्ये प्रवेश घेण्याचे स्वप्न असते. मात्र अनेक विद्यार्थ्यांना माहिती नाही की संगणक विज्ञान अभियांत्रिकी क्षेत्रात असे अनेक कोर्सेस आहेत, ज्यामध्ये तुम्ही खूप चांगले करिअर करून लाखो नव्हे तर कोटीत कमाई करू शकता. जाणून घ्या इंजिनिअरिंग मधील टॉप 7 कोर्सविषयी.. ज्यासाठी तुम्हाला 12 वी नंतर प्रवेश घेता येईल.

संगणक विज्ञान अभियांत्रिकी (Computer Science Engineering) मधील 7 अभ्यासक्रम
1. माहिती तंत्रज्ञानामध्ये B.Sc –
कॉम्प्युटर नेटवर्क, प्रोग्रामिंग आणि सिस्टम ॲनालिसिसमध्ये काम करण्यास इच्छुक विद्यार्थी हा कोर्स निवडू शकतात. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला 3 ते 6 लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते.
2. माहिती तंत्रज्ञानातील बी.टेक – (Career After 12th)
तुम्हाला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात तुमचे करिअर करायचे असेल, तर तुम्ही हा कोर्स बारावीनंतर करू शकता. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर, तुम्ही नेटवर्क प्रशासक किंवा सायबर सुरक्षा विश्लेषक म्हणून काम करू शकता आणि 6 ते 9 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज मिळवू शकता.

3. संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकीमध्ये बी.टेक –
हा पदवी अभ्यासक्रम तुम्ही बारावीनंतर करू शकता. हा चार वर्षांचा कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्हाला 8 ते 10 लाख रुपयांचे वार्षिक पॅकेज सहज मिळेल.
4. B.Sc in Computer Science –
तुम्हाला प्रोग्रामिंग, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट आणि अल्गोरिदममध्ये स्वारस्य असल्यास, तुम्ही हा कोर्स निवडू शकता. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला 3 ते 6 लाख रुपयांचे प्रारंभिक पॅकेज सहज मिळू शकते.

5. डेटा सायन्समध्ये B.Sc –
ज्या विद्यार्थ्यांना डेटा ॲनालिस्ट, एमएल (Career After 12th) आणि स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग म्हणून करिअर करायचे आहे ते या कोर्समध्ये पदवी मिळवू शकतात. डेटा विश्लेषक, वैज्ञानिक किंवा BI विश्लेषक म्हणून काम करून, तुम्हाला प्रति वर्ष 7 ते 10 लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकेल.
6. बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन –
ज्या विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स आणि प्रोग्रामिंग भाषा शिकण्यात रस आहे ते बीसीए करू शकतात. हा कोर्स त्यांच्यासाठी सर्वोत्तम असेल. हा कोर्स केल्यानंतरही तुम्हाला नोकरीत ३ ते ५ लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते.
7. संगणक विज्ञानातील अभियांत्रिकी पदवी –
या कोर्समध्ये हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर (Career After 12th) शिकवले जातात. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनीअर आणि डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून 5 ते 8 लाख रुपयांचे पॅकेज मिळू शकते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com