Career After 12th : 12 वी नंतर टुरिझम क्षेत्रात करा ‘हे’ कोर्स; मिळेल चांगली नोकरी अन् भरघोस पगार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । ज्यांना देश विदेशातील वेगवेगळी (Career After 12th) ठिकाणे पाहण्याची आणि प्रवास करण्याची आवड असेल; अशा तरुणांना टुरिझम क्षेत्रात करिअर करण्याचा उत्तम पर्याय उपलब्ध आहे. 12 वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तुम्ही यूजी किंवा डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स करू शकता. उच्च शिक्षण घेण्यासाठी तुम्ही या क्षेत्रात उपलब्ध असलेले पीजी पदवी किंवा पीजी डिप्लोमा कोर्स देखील करू शकता. या क्षेत्रात करिअर करण्यासोबतच तुम्हाला लाखात पगार मिळू शकतो. पाहूया या क्षेत्रातील करिअरच्या संधीविषयी…

12 वी नंतर घेता येईल शिक्षण (Career After 12th)
जर तुम्हीही नवीन ठिकाणांना भेट देण्याचे स्वप्न पाहत असाल तर तुम्ही पर्यटनाच्या (Travel and Tourism) क्षेत्रात तुमचे करिअर घडवू शकता. पर्यटन क्षेत्रात उत्तम करिअर घडवण्यासोबतच तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. तुम्ही बारावीनंतरच पर्यटन क्षेत्रात शिक्षण घेण्यास सुरुवात करू शकता. 12वी नंतर, तुम्ही या क्षेत्रातील विविध अंडर ग्रॅज्युएट (यूजी) कोर्सेस/डिप्लोमा किंवा सर्टिफिकेट कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊन त्याची सुरुवात करू शकता. उच्च शिक्षणासाठी तुम्ही यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा पीजी डिप्लोमा कोर्सही करू शकता. या क्षेत्रातील काही प्रमुख अभ्यासक्रम पुढे दिले आहेत…

1. बैचलर डिग्री इन ट्रॅव्हल अँड टुरिझम
2. बैचलर ऑफ टुरिझम एडमिनिस्ट्रेशन
3. बैचलर ऑफ टुरिझम स्टडीज
4.. सर्टिफिकेट कोर्स इन टूरिस्ट गाइड
5. सर्टिफिकेट इन ट्रॅव्हल मॅनेजमेंट (Career After 12th)
6. एमबीए इन ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट
7. मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन इन टुरिझम अँड हॉस्पिटलिटी मॅनेजमेंट
8. एम. ए. इन टुरिझम मॅनेजमेंट
9. डिप्लोमा इन ट्रॅव्हल मॅनेजमेंट अँड एयरपोर्ट मॅनेजमेंट

कोणत्या पदावर मिळेल नोकरी?
हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला ट्रॅव्हल गाइड, ट्रॅव्हल एजंट, टूर मॅनेजर, ट्रॅव्हल कन्सल्टंट, ट्रॅव्हल स्पेशालिस्ट, टुरिझम ऑफिसर अशा पदांवर नोकरी मिळवू शकता. या पदांवर टूर आणि (Career After 12th) ट्रॅव्हलशी संबंधित विविध कंपन्यांमध्ये नोकऱ्या दिल्या जातात. सुरुवातीला तुम्हाला 3 लाख ते 7 लाख रुपये पगार मिळू शकतो पण वेळ आणि अनुभवानुसार पगारामध्ये वाढ होत जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com