Career After 10th : 10 वी पास झाल्यानंतर ‘या’ क्षेत्रात मिळेल सरकारी नोकरी; पगारही मिळेल शानदार

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आपल्या देशात प्रत्येकाला सरकारी नोकरी (Career After 10th) मिळवायची असते, पण सरकारी नोकरी मिळवण्यासाठी पात्रता असणं खूप गरजेचं आहे ज्यामध्ये प्रत्येकजण बसू शकत नाही. येथे आम्ही अशाच काही सरकारी नोकऱ्यांबद्दल माहिती देणार ​​आहोत ज्यासाठी तुम्ही 10वी पास झाल्यानंतर सहभागी होऊ शकता. 10 वी पास झाल्यानंतर तुम्हाला रेल्वे, भारतीय पोस्ट, भारतीय सैन्य इत्यादींमध्ये नोकरी मिळू शकते. जाणून घेवूया सविस्तर….

भारतात अनेक कारणांसाठी सरकारी नोकरीचा पर्याय (Career After 10th) सर्वोत्तम मानला जातो. सरकारी नोकरीमुळे समाजात वेगळीच प्रसिद्धी मिळते. सरकारी सुविधांसोबतच चांगला पगारही मिळतो. त्यामुळे प्रत्येकजण सरकारी नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही तुम्हाला अशाच काही सरकारी नोकऱ्यांबद्दल सांगत आहोत ज्यामध्ये तुम्ही 10वी उत्तीर्ण झाल्यावरच सहभागी होऊ शकता. 10वी पास झालेल्या उमेदवारांसाठी विविध क्षेत्रांमध्ये तसेच सैन्यात नोकऱ्या उपलब्ध आहेत. यामध्ये सहभागी होऊन तुम्हाला सरकारी नोकरीबरोबरच देशसेवेचीही संधी मिळू शकते.

पोस्टल सेवेतील नोकरी
तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही भारतीय पोस्टमधील नोकरीमध्ये सहभागी होऊ शकता. यामध्ये पोस्टल असिस्टंट, शॉर्टनिंग असिस्टंट, मल्टी टास्किंग स्टाफ यासह अनेक पदांवर भरती केली जाते; ज्यामध्ये तुम्ही 10वी पास झाल्यानंतर अर्ज करू शकता.
पोलीस हवालदार (Career After 10th)
अनेक राज्यांमध्ये पोलीस कॉन्स्टेबल पदांच्या भरतीसाठी दहावी पास असणे आवश्यक आहे. त्यामुळे जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही पोलिस खात्यातही सरकारी नोकरीसाठी पात्र ठरू शकता.

रेल्वे विभाग
10वी उत्तीर्णांसाठी भारतीय रेल्वेमध्ये अनेक पदांवर सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत. ट्रॅकमन, गेटमन, पॉइंट्समन, हेल्पर, पोर्टर इत्यादींसह इतर अनेक पदे आहेत. यासोबतच रेल्वेमध्ये 10वी पाससाठी शिकाऊ पदांसाठी वेळोवेळी भरतीच्या जाहिराती सोडल्या जातात.
वन रक्षक विभाग
आपल्या देशात अशी अनेक राज्ये आहेत जिथे (Career After 10th) वनरक्षक पदांसाठी सरकारी नोकऱ्या वेळोवेळी येत राहतात. अनेक राज्यांमध्ये या पदासाठी शैक्षणिक पात्रता फक्त 10वी उत्तीर्ण अशी आहे. त्यामुळे दहावीनंतर या पदावर सरकारी नोकरी मिळू शकते.

आर्म्ड फोर्समधील नोकऱ्या
10वी पास उमेदवारांसाठी सशस्त्र दलातही (Career After 10th) सरकारी नोकऱ्या उपलब्ध असतात. यामध्ये तुम्ही आर्मी, इंडियन नेव्ही किंवा इंडियन एअर फोर्समधील विविध पदांच्या भरतीसाठी अर्ज करू शकता. यामध्ये सामील होऊन तुम्हाला नोकरी सह देशसेवेची संधी मिळते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com