करिअरनामा ऑनलाईन । 10वीच्या निकालाची तारीख जवळ येवून (Career After 10th) ठेपली आहे. परीक्षा झाल्यानंतर सुट्टीचा आनंद घेत असताना अनेक विद्यार्थ्यांना प्रश्न पडला असेल की, निकाल लागल्यानंतर करिअरसाठी नक्की कोणता पर्याय निवडायचा? कारण या निर्णयावर तुमचं पुढील भवितव्य अवलंबून असतं. 10वीनंतर विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रम करु शकतात. 10वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये आयटीआय अभ्यासक्रमदेखील खूप लोकप्रिय आहे. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड असतात, ज्यातून विद्यार्थी त्यांच्या आवडीचे विषय निवडू शकतात.
बऱ्याचदा असं पहायला मिळतं, की बहुतांश विद्यार्थी नेहमी एकाच लोकप्रिय कोर्सकडे धाव घेतात. त्या कोर्समधून हजारो मुलं शिक्षण घेतात. परिणामी विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने त्यामधील अनेक मुळे बेरोजगारच राहतात. याउलट फुटवेअर टेक्नॉलॉजी, मेटलर्जीसारख्या विषयातून (Career After 10th) राज्याभरातून अवघी 120 मुलंच दरवर्षी बाहेर पडत असल्याने त्यांना लगेच नोकरी मिळते. काही वेळा या कोर्ससाठी हुशार मुलं प्रवेशही घेत नसल्याने अवघ्या 40 टक्के मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळतो आणि त्यांना नोकरीचीही संधी चालून येते. तेव्हा तुम्ही नीट विचार करुनच योग्य पर्याय निवडा….
1. सायन्स (Career After 10th)
पीसीएमबी – बारावीतील फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स आणि बायोलॉजी या चारही विषयांवर आधारित बायो केमिस्ट्री, बायो मेडिकल इंजिनीअरिंग, बायो टेक्नॉलॉजी, बायो इन्फॉर्मेटिक्स, फार्मसी असे विषय निवडता येतात.
पीसीएम – या विषयांनुसार आर्किटेक्चर, डिफेन्स, नेव्ही, इंजिनीअरिंग, पायलट ट्रेनिंग, टेक्नॉलॉजीकडे वळता येतं.
पीसीबी – मेडिकल, व्हेटर्नरी सायन्स अॅण्ड अॅनिमल हजबण्डरी, पॅरामेडिकल कोर्सेस, अॅग्रीकल्चर सायन्स अशा विषयांसाठी हा ग्रुप उपयोगी पडतो.
एव्हिएशन, फूड सायन्स, फोरेन्सिक सायन्स, एन्व्हायर्न्मेंटल सायन्स, मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी, बायो टेक्नॉलॉजी, लाइफ सायन्स, मॅथमेटिक्स यात पदवी अभ्यासक्रम करता येतो. (Career After 10th)
हे सर्व कोर्स चार ते पाच वर्षांचे असून त्यासाठी प्रवेश परीक्षा द्यावी लागते.
2. ITI अभ्यासक्रम
आयटीआय अभ्यासक्रम विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. आयटीआयमध्ये बरेच ट्रेड आहेत, जे विद्यार्थी त्यांच्या पसंतीनुसार निवडू शकतात. यामधील काही लोकप्रिय कोर्स पुढीलप्रमाणे –
1. आयटीआय टर्नर
2. आयटीआय मेकॅनिक
3. आयटीआय वेल्डर (Career After 10th)
4. आयटीआय प्लंबर
5. आयटीआय इलेक्ट्रीशियन
6. डिप्लोमा
3. इंजिनिअरिंग डिप्लोमा
दहावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी अभियांत्रिकी विषयात डिप्लोमा करू शकतात, त्यासाठी दहावीत गणित व विज्ञान विषय विद्यार्थ्यांनी घेतलेले असावेत. हे डिप्लोमा कोर्स 3 वर्षांचे असतात. आम्ही अशा काही डिप्लोमा अभ्यासक्रमांची नावे पुढे देत आहोत.
1. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग
2. डिप्लोमा इन टेक्सटाइल इंजीनियरिंग
3. डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजीनियरिंग
4. डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग
5. डिप्लोमा इन सिविल इंजिनीअरिंग (Career After 10th)
6. डिप्लोमा इन आयसी इंजिनीअरिंग
7. डिप्लोमा इन ईसी इंजिनीअरिंग
8. डिप्लोमा इन माइनिंग इंजिनीअरिंग
या डिप्लोमा अभ्यासक्रमांनंतर विद्यार्थ्यांना थेट इंजिनीअरिंगच्या पदवीला द्वितीय वर्षाला प्रवेश मिळतो.
4. फाइन आर्ट्स/परफॉर्मिंग आर्ट्स
आर्ट अॅण्ड क्राफ्ट, सिरॅमिक अॅण्ड पॉटरी, डान्स, ड्रॉइंग, फर्निचर अॅण्ड इंटेरिअर डिझाइन, म्युझिक, स्कल्प्चर अशा कलेशी संबंधित विषयांमध्येही करिअर (Career After 10th) होऊ शकतं. मात्र त्यासाठी विषयाची आवड आणि कौशल्य लागतं. लहानपणापासून या विषयांचा अभ्यास केला तर त्यात करिअरसाठी उत्तम संधी आहेत.
5. बॅचलर इन डिझायनिंग
काळानुरुप प्रत्येक वस्तूचं डिझाइन बदलत राहतं. प्रत्येक वस्तू वेगळ्या पद्धतीने प्रेझेंट केली जाते. हे डिझाइन करण्यासाठी प्रोडक्ट डिझाइन, फर्निचर अॅण्ड इंटिरिअर डिझाइन, सिरॅमिक अॅण्ड ग्लास डिझाइन, ग्राफिक डिझाइन, अॅनिमेशन, व्हिडिओ कम्युनिकेशन अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. मात्र यासाठी केवळ चित्रकला पुरेशी नसून कल्पनाशक्तीची गरज असते.
उद्योजक व्हा! (Career After 10th)
करिअरसाठी तुमच्याकडे भरपूर संधी उपलब्ध आहेत. पण फक्त नोकरी करण्याच्या विचाराने त्याकडे पाहू नका. मनात कायम जिज्ञासा ठेवली, झोकून काम केलं, चिकाटी, प्रामाणिकता, गणिती वृत्ती ठेवली तर व्यवसायातही यश मिळू शकतं. चांगल्या मार्गाने पैसे कमावण्याचा विचार आणि (Career After 10th) व्यवहारी वृत्ती ठेवली पाहिजे. तरुणांना स्वयंरोजगार निर्माण करता येईल, या हेतूने शासनाने पॉलिटेक्निक कोर्स सुरू केले. मात्र शासकीय तसंच खाजगी संस्थांमधून बाहेर पडणारी मुले केवळ नोकरीचाच विचार करतात, स्वतः उद्योग सुरू करून इतरांना नोकरी देत नाहीत, त्यामुळे नोकऱ्यांचा तुटवडा निर्माण होतो.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com