Business Success Story : इंग्लिश बोलता येत नव्हतं; उभारली देशातील सर्वात मोठी IPO आणणारी कंपनी; वाचा Paytm ची यशोगाथा

करिअरनामा ऑनलाईन । तुम्ही स्मार्टफोन वापरत असाल आणि ऑनलाइन शॉपिंग (Business Success Story) करत असाल तर तुम्हाला Paytm नाव माहित असणारच यात शंका नाही. कारण ही कंपनी भारतात खूप लोकप्रिय आहे आणि भारतातील बहुतेक लोक ऑनलाइन खरेदी करताना पैसे देण्यासाठी Paytm App वापरतात. पेटीएम हा डिजिटल व्यवहारांसाठीचा (Digital Transactions) देशातला सर्वांत मोठा प्लॅटफॉर्म आहे. आयपीओ आणण्यापूर्वी या कंपनीने अनेक बदल केले आहेत. कंपनीच्या बोर्डावरून चीनच्या संचालकांना हटवण्यात आलं आहे. तसंच, कंपनीने 5.1 लाख शेअर्स 80 कर्मचाऱ्यांना दिले होते. कंपनीचं मूल्य 1.85 लाख कोटी रुपये असल्याचं मानलं जात आहे.

कोण आहेत पेटीएमचे सीईओ

पेटीएम कंपनीचे संस्थापक आणि सीईओ विजय शेखर शर्मा आज कोट्यवधी-अब्जावधींचा बिझनेस करत आहेत. त्यांचा जन्म उत्तर प्रदेशातल्या अलीगढमधल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात (Business Success Story) झाला होता. त्यांची आई गृहिणी, तर वडील शाळेत शिक्षक होते. विजय शेखर शर्मा 12 वी पर्यंत हिंदी माध्यमातून शिकले. ग्रॅज्युएशनसाठी ते दिल्लीला गेले. तिथे त्यांनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या विषयात पदवी घेतली.

इथून झाली व्यावसायिक जिवनाची सुरुवात (Business Success Story)

विजय शेखर शर्मा यांचं इंग्रजी फारसं चांगलं नव्हतं. त्यामुळे त्यांनी 12 वी पर्यंतचं शिक्षण हिंदी माध्यमातून घेतलं होतं. पण कॉलेजमध्ये असताना मात्र त्यांना इंग्लिश कच्च असल्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागला. तेव्हा त्यांनी इंग्लिश शिकण्याचा निश्चय केला आणि त्यानुसार अंमलबजावणीही केली. 1997 मध्ये (Business Success Story) कॉलेजमध्ये शिकत असतानाच त्यांनी indiasite.net ही वेबसाइट सुरू केली होती. त्यानंतर दोनच वर्षांत त्यांनी ती वेबसाइट काही लाख रुपयांत विकली. त्यांच्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात इथूनच झाली. त्यानंतर त्यांनी 2000 साली one97 communications या कंपनीची स्थापना केली. न्यूज, क्रिकेट स्कोअर, रिंगटोन, जोक्स, एक्झाम रिझल्ट्स आदींसारखा मोबाइल कंटेंट त्या माध्यमातून दिला जायचा. हीच पेटीएमची मातृसंस्था आहे. दक्षिण दिल्लीत भाड्याच्या एका छोट्या खोलीतून या कंपनीची सुरुवात झाली होती.

‘फोर्ब्ज, फॉर्च्युन मासिकांच्या जुन्या प्रती खरेदी करायचो’

एका मुलाखतीत विजय शेखर शर्मा यांनी सांगितलं होतं, की “मी जेव्हा दिल्लीत राहायचो, तेव्हा रविवारच्या बाजारात फिरायचो आणि तिथून फोर्ब्ज, फॉर्च्युन अशा मासिकांच्या जुन्या प्रती (Business Success Story) खरेदी करायचो. अमेरिकेच्या सिलिकॉन व्हॅलीत एका गॅरेजमधून सुरू झालेल्या कंपनीबद्दल मला त्यातूनच कळलं होतं. ही जुनी मासिके आणि त्यामध्ये छापून येणारे लेख माझ्यासाठी प्रेरणा ठरत होते.”

त्यानंतर शर्मा अमेरिकेत स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीत शिकायला गेले. भारतात Startup ना काहीही पाठबळ नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं. पुन्हा भारतात आल्यानंतर त्यांनी आपल्या बचतीच्या पैशांतून सुरुवात केली. मित्रमंडळी, नातेवाईकांकडूनही पैसे घ्यावे लागले. पण तेही थोड्याच कालावधीत संपले. शेवटी 24 टक्के व्याजावर 8 लाख रुपयांचं कर्ज त्यांना मिळालं.

हे पण वाचा -
1 of 3

‘तोट्यातली कंपनी फायद्यात आणली’ (Business Success Story)

व्यवसायाच्या वाटचालीविषयी शर्मा यांना विचारले असता ते सांगतात; “एक दिवस मला एक सज्जन व्यक्ती भेटली. त्यांनी मला सांगितलं, की त्यांची तोट्यातली कंपनी फायद्यात आणणार असेन, तर ते माझ्या कंपनीत पैशांची गुंतवणूक करायला तयार आहेत. मी त्यांचा व्यवसाय फायद्यात आणून दिला आणि त्यांनी माझ्या कंपनीत गुंतवणूक केली. त्यातून मी कर्ज फेडू शकलो आणि माझ्या व्यवसायाची गाडी रुळावर आली.”‘ असं शर्मा यांनी सांगितलं होतं.

21 वर्षांपूर्वी झाली Paytm ची सुरुवात

2001 साली विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम नावाची एक कंपनी सुरू केली. त्या वेळी पेटीएमवर प्रीपेड रिचार्ज, डीटीएच रिचार्ज आदी सेवा दिल्या जायच्या. त्यानंतर विजय यांनी आपल्या कंपनीची (Business Success Story) व्याप्ती वाढवायचं ठरवलं आणि अन्य बाबींवर लक्ष द्यायला सुरुवात केली. त्यातूनच वीजबिल, गॅसबिल भरण्याचीही सुविधा पेटीएमवर उपलब्ध झाली. पेटीएमने हळूहळू अन्य कंपन्यांप्रमाणेच ऑनलाइन व्यवहारांची सुरुवात केली. 2016 साली झालेल्या नोटाबंदीच्या निर्णयावेळी कंपनीला मोठा लाभ झाला. त्यानंतर केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत पेटीएमची भरभराट झाली.

Paytm चा अर्थ काय?

बरेच Paytm युजर्स त्याच्या नावाबद्दल गोंधळतात आणि अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. खरे पाहता Paytm चा पूर्ण फॉर्म आणि अर्थ Pay Through Mobile असा आहे. ज्याचा हिंदीत अर्थ (Business Success Story) मोबाईलद्वारे पेमेंट करणे. याची सुरुवात फक्त मोबाईल पेमेंटने झाली होती, पण आता त्याची सेवा इतर क्षेत्रात देखील वाढली आहे. Paytm भारतात इतके लोकप्रिय झाले आहे की बहुतेक स्मार्टफोन युजर्स पेमेंटसाठी Paytm चा वापर करताना दिसतात. तमाम तरुण वर्गासाठी विजय शर्मा यांचा प्रवास नक्कीच प्रेरणा देणारा ठरणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com