Business Success Story : अवघ्या 7 महिला अन् 80 रुपयांचं कर्ज; आज करतात करोडोंची उलाढाल; ‘लिज्जत’ पापडची कशी झाली सुरुवात

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पापड म्हणलं की ओठावर (Business Success Story) एकच नाव येतं ते म्हणजे ‘लिज्जत पापड’. हा ब्रॅंड आज कोटीत उलाढाल करत आहे. या व्यवसायाने सन 2019 मध्ये 1600 कोटी रुपयांचा व्यवसाय केला. 2021 मध्ये जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, लिज्जत पापडने देशभरात 45,000 महिलांना रोजगार दिला आहे. ज्या दररोज 4.8 दशलक्ष म्हणजेच 48 लाख पापड बनवतात. या व्यवसायाची सुरुवात अवघ्या 7 महिलांनी केवळ 80 रुपयांचे कर्ज घेऊन केली होती. कामाच्या पहिल्या दिवशी लिज्जतची फक्त 4 पाकिटे तयार झाली.

Business Success Story of Lijjat Papad

अशी झाली सुरुवात

ही 1959 सालची गोष्ट आहे. मुंबईतील गिरगावमध्ये राहणाऱ्या सात गुजराती गृहिणींनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. जसवंतीबेन जमनादास पोपट, पार्वतीबेन रामदास थोडानी, उजमबेन नारंददास कुंडलिया, बानुबेन एन तन्ना, लागुबेन अमृतलाल गोकाणी, जयबेन व्ही विठ्ठलानी आणि दिवाळीबेन लुक्का (Business Success Story) यांनी छगनलाल करमसी पारेख नावाच्या सामाजिक कार्यकर्त्याकडून त्यांच्या व्यवसायासाठी 80 रुपये उसने घेतले.

या अर्धसाक्षर महिलांनी आपल्या स्वयंपाकाच्या कौशल्याचा फायदा घेत पापड बनवण्याचा निर्णय घेतला. एका मुलाखतीत जसवंतीबेन म्हणतात; “आम्ही कमी शिकलेल्या होतो, त्यामुळे आम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता कमी झाली होती. एकेदिवशी आमच्या असं लक्षात आलं की जर पापड बनवण्याच्या आमच्या कौशल्याचा उपयोग आम्ही व्यवसायात केला तर आम्ही आमच्या पतीवर येणाऱ्या आर्थिक जबाबदारीचं ओझं कमी करू शकतो.”

Business Success Story of Lijjat Papad

असं मिळालं ‘लिज्जत’ नाव (Business Success Story)

15 मार्च 1959 रोजी सातही महिला मुंबईतील गजबजलेल्या भागात एका जुन्या इमारतीच्या टेरेसवर जमल्या आणि त्यांनी पापडाची चार पाकिटे तयार केली. एका वर्षात त्यांनी 6,000 रुपयांहून अधिक किमतीचे पापड विकले. 1962 मध्ये रोख पारितोषिक स्पर्धेत निवड झाल्यानंतर या ब्रँडला ‘लिज्जत’ हे नाव मिळाले.

देशभरात 82 शाखा

या व्यवसायात हळूहळू महिलांची संख्या शेकडो ते हजारो पर्यंत वाढली. 2021 पर्यंत, लिज्जतसोबत काम करणाऱ्या महिलांची संख्या 45,000 पेक्षा जास्त होती. सध्या (Business Success Story) लिज्जतच्या देशभरात 82 शाखा आहेत. लिज्जतची उत्पादने अमेरिका आणि सिंगापूरसारख्या देशांमध्येही विकली जातात. आता लिज्जत कंपनी पापडा व्यतिरिक्त खाकरा, बेकरी उत्पादने आणि अनेक प्रकारचे मसाले देखील बनवते.

Business Success Story of Lijjat Papad

महिलांच्या हाती सगळी धुरा

लिज्जत पापड उद्यमची प्रत्येक महिला सदस्य तिच्या पापड बनवण्याच्या क्षमतेनुसार आणि संस्थेतील स्थानानुसार कमाई करते. इथल्या काही स्त्रिया त्यांच्या पतीपेक्षा (Business Success Story) जास्त कमावतात. संस्थेच्या अध्यक्षा स्वाती रवींद्र पराडकर यांनी गेल्या वर्षी सांगितले होते की; “आमच्या काही स्त्रिया त्यांच्या पतीपेक्षा जास्त कमावतात. आणि त्यासाठी त्याचे कुटुंबीय त्यांचा आदर करतात.”

लिज्जतमध्ये फक्त ड्रायव्हर, दुकान सहाय्यक आणि मदतनीस म्हणून पुरुषांची भरती केली जाते. कंपनीची रचना अशी आहे की पापड लाटणाऱ्या महिलांचे स्थान वाढतच जाते. संस्थेच्या अध्यक्षा स्वाती रवींद्र पराडकर या स्वतः दुसऱ्या पिढीच्या सह-मालक आहेत. वडिलांच्या निधनानंतर वयाच्या 10 व्या वर्षी त्यांनी आईसोबत पापड बनवायला सुरुवात केली.

Business Success Story of Lijjat Papad

कंपनी पद्मश्रीने सन्मानित

नोव्हेंबर 2021 मध्ये, लिज्जत पापड एंटरप्रायझेसच्या सह-संस्थापक, 90 वर्षीय जसवंतीबेन जमनादास पोपट यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते देशाच्या (Business Success Story) प्रतिष्ठित पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 2005 साली देशाचे तत्कालीन राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी लिज्जतला ‘ब्रँड इक्विटी’ पुरस्काराने सन्मानित केले. 2003 मध्ये लिज्जतला देशातील सर्वोत्कृष्ट कुटीर उद्योग पुरस्कार मिळाला. 2002 मध्ये, कंपनीला इकॉनॉमिक टाइम्सने बिझनेस वुमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित केले.

Business Success Story of Lijjat Papad

लिज्जतवर चित्रपट बनणार (Business Success Story)

लिज्जतची कथा ही स्वावलंबन आणि महिला सक्षमीकरणाची कथा आहे. चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर ही कथा मोठ्या पडद्यावर दाखवणार आहेत. या चित्रपटात बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com