Big News : सावधान!! निकालानंतर बँजो, फटाके, गुलाल उधळल्यास होणार कारवाई; भावी अधिकाऱ्यांना पोलिसांचा इशारा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । कोणतीही स्पर्धा परीक्षा पास होणं हा क्षण (Big News) त्या उमेदवाराच्या आयुष्यातील अतुलनीय आनंदाचा क्षण समजला जातो. वर्षानुवर्षे, रात्रंदिवस कष्ट घेतल्यानंतर विद्यार्थी या परीक्षेत पास होतात. निकालाचा दिवस हा त्यांच्यासाठी अत्युच्च आनंदाचा दिवस समजला जातो. स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी निकालानंतर गुलाल उधळणे, फटाके वाजवणे, मित्रांसाह डिजे किंवा बँजोच्या तालावर नाचताना आढळून येतात. पण आता सावधान!! यापुढील काळात असे प्रकार समोर आल्यास संबंधित उमेदवारावर गुन्हे दाखल केले जातील; असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. भावी अधिकाऱ्यांना सूचना वजा इशारा देण्याची वेळ पोलीस प्रशासनावर येणे लज्जास्पद असल्याचे समितीने म्हटले आहे.

“स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवार ज्या पद्धतीने (Big News) विजयोत्सव साजरा करतात या पध्दती विरुद्ध आम्ही फार आधीपासून आहोत. मित्रांनो तुम्ही पोस्ट कष्टाने आणि संघर्षाने मिळवता यात शंका नाही, तुमच्या यशाचे कौतुक आहेच, तुमचं यश इतरांना प्रेरणादायी ठरावे त्रासदायक ठरू नये;” असे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने एक्स या सोशल मीडिया अकाऊंट वर म्हटले आहे.

स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थी निकालानंतर गुलाल, फटाके, कर्णकर्कश वाद्ये इत्यादींचा वारंवार वापर करताना निदर्शनास आलेले आहे. याचा आजूबाजूच्या रहिवाशांना प्रचंड त्रास होत असल्याने रहिवाशांनी पोलीस स्टेशनला वारंवार तक्रार केलेली आहे. तसेच काही विद्यार्थ्यांना पोलीस स्टेशनमध्ये बोलावून त्यांना तशी समज सुद्धा दिली आहे.

तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये मिळवलेल्या यशाचा आम्हाला सार्थ (Big News) अभिमान व आनंद आहे. आम्ही सर्व स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना नम्रपणे आवाहन करतो की, आपण आपल्या यशाचा आनंद पेढे वाटून तसेच पुष्पगुच्छ देऊन साजरा करावा. यापुढे गुलाल, फटाके, कर्णकर्कश वाद्ये इत्यादींचा वापर केल्यास गुन्हे दाखल केले जातील, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, अशा प्रकारचे मुजकूर असलेले फलक पोलीस प्रशासनाकडून लावण्यात आले आहेत.

सध्या देशात लग्न सराईचा हंगाम सुरू आहे; तसेच संपूर्ण (Big News) देशभरात लोकसभेची रणधुमाळी सुरू आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी, फटाक्यांची आतिषबाजी; जेसीबीतून गुलालाची उधळण तसेच डिजे, बॅण्ड-बँजोच्या तालावर तरुणाई बेभान होताना दिसते. तर दुसरीकडे असं चित्र आहे; की स्पर्धा परीक्षेतील यशस्वी उमेदवार आनंदोत्सव साजरा करताना आढळला तर त्या उमेदवारावर गुन्हे दाखल केले जातील; असा इशारा पोलीस प्रशासनाकडून देण्यात आला आहे. यावर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. भावी अधिकाऱ्यांना सूचना वजा इशारा देण्याची वेळ पोलीस प्रशासनावर येणे ही बाब लज्जास्पद आणि न पटणारी आहे; असं समितीने म्हटले आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com