करिअरनामा ऑनलाईन । बी. ए. एम. एस. चं शिक्षण घेणाऱ्या मराठी (Big News) विद्यार्थ्यांचा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडला होता. या प्रश्नाची मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ दखल घेऊन महाराष्ट्रातील बी. ए. एम. एस.च्या (BAMS) विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बी. ए. एम. एस. केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी आता राज्यातून प्रवेश मिळणार आहे.
मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश (Big News)
महाराष्ट्राचे निवासी असलेल्या परंतु अन्य राज्यातून बी. ए. एम. एस. केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश मिळत नव्हता. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासमवेत आज वर्षा निवासस्थानी झालेल्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांना आयुर्वेद विद्यार्थ्यांवरील हा अन्याय दूर करण्यासाठी योग्य पावले उचलण्याच्या सूचना केल्या. यासाठी पदव्युत्तर प्रवेश नियमांत आवश्यक ते बदल करून मान्यतेसाठी लगेच सादर करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
85% कोटा(शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच 70% कोटा (खाजगी विना अनुदानित)
राज्याच्या 85% कोटा(शासकीय व खाजगी अनुदानित) तसेच 70% कोटा (खाजगी विना अनुदानित) या कोट्यातून प्रवेश घेण्यासाठी अन्य राज्यातून बी. ए. एम. एस. केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आता संधी मिळणार आहे. त्यामुळे, गेल्या अनेक वर्षांपासूनची बी. ए. एम. एस. विद्यार्थ्यांची मागणीच आज राज ठाकरे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे पूर्णत्वास आली आहे. यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मनसेच्या (Big News) शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या भेटीमध्ये मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर चर्चा करण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com