Big News : धक्कादायक!! मैदानी चाचणी सुरु असतानाच तरुणावर काळाचा घाला; पोलीस होण्याआधीच मृत्यूनं कवटाळलं

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । राज्यभरातील अनेक तरूण-तरुणी (Big News) पोलीस भरती होण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतात. त्याचप्रमाणे तुषार भालके हा तरुण मागील काही वर्षापासून पोलीस भरतीची तयारी करत होता. परीक्षेची तारीख जाहीर होताच आपले नशीब आजमावण्यासाठी त्याने पुणे गाठलं. मात्र पोलीस बनायचं त्याचं हे स्वप्न अधुरं राहिलं. अंतिम चाचणी सुरु असताना त्याने पोलीस मैदानातच अखेरचा श्वास घेतला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना भालके कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

तुषार भालके संगमनेरचा रहिवासी (Big News)
मुंबई येथे एसआरपीएफ भरतीच्या मैदानी चाचणी दरम्यान दोन तरूणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यात एका तरूणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत्यू पावलेला तरूण तुषार भालके (वय 27) हा संगमनेर तालुक्यातील रहिवासी आहे. तुषार पुणे येथे सुरू असलेल्या पोलीस भरती मैदानी चाचणी दरम्यान धावत असताना त्याला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर पडला. दरम्यान त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला. खाकी वर्दी घालून देशसेवा करण्याचे त्याचे स्वप्न अखेर स्वप्नच राहिले.

तुषारच्या बाबतीत नेमकं काय घडलं?
पुण्यात शिवाजीनगर पोलीस ग्राऊंडवर पोलीस भरती (Police Bharti) प्रक्रिया सुरू आहे. तुषार भालके या युवकाने धावण्याच्या चाचणीत तीन राऊंड पूर्ण केले. पण धावत असताना त्याच्या पायात (Big News) अचानक क्रँम्प आला, मस्सल ब्रेक झाले आणि तो जागीच कोसळला. त्यानंतर घटनास्थळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला तात्काळ अँम्ब्युलन्समधून पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल केले. पण डिहायड्रेशन होऊन प्रथम त्याची किडनी फेल झाली आणि मग ह्रदय बंद पडून आणि त्यातच मल्टिपल ऑर्गन फेलुअर होऊन त्याचा उपचारादरम्यान दूर्दैवी अंत झाला.

पोलीस भरती, आर्मी तसेच इतर सरकारी नोकरीच्या स्पर्धात्मक प्रक्रियेत तरुण-तरुणी अतिशय धावपळ करतात व अनेकदा खूप तणावाखाली राहतात. हा ताण तणाव कधी कधी (Big News) जिवावर बेततो. आनंदी व यशस्वी जीवन जगण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेवून पुढे जाणे गरजेचे आहे; हे यानिमित्त आवर्जून सांगावे वाटते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com