Big News : महाराष्ट्रातील तब्बल 4 लाख तरुणांना जर्मनीत मिळणार रोजगार; अजित पवारांनी सांगितले….

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची (Big News) टंचाई निर्माण झाली आहे. या तुलनेत भारताकडे इतर देशांमध्ये कुशल मनुष्यबळ पुरविण्याची जास्त क्षमता आहे. या उद्देशाने राज्य सरकारने जर्मनीमध्ये मनुष्यबळ पुरविण्यासंदर्भात सामंजस्य करार केला आहे. या प्रक्रियेतून राज्यातील सुमारे 4 लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे; अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. बारामती तालुक्यातील माळेगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या डिजिटल सी एन सी सिम्युलेशन लॅबच्या उद्धाटन समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला, या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

जर्मनीत 4 लाख वाहनचालकांची गरज (Big News)
हाती आलेल्या महितीनुसार जर्मनीत सध्या एकूण 4 लाख वाहनचालकांची गरज आहे. त्यामुळेच राज्यांतील चालकांना जर्मन भाषा शिकवून तसेच योग्य प्रशिक्षण देऊन त्यांना थेट जर्मनीत पाठवले जाणार आहे. परदेशात नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. पण भाषेची मर्यादा आणि संवाद कौशल्य नसल्यामुळे तरुण-तरुणी नोकरीसाठी परदेशात जाऊ शकत नाहीत; ही शोकांतिका आहे.

‘या’ तरुणांना मिळणार प्रशिक्षण
मुळात जर्मनीमध्ये तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या कर्मचार्‍यांची कमतरता आहे. त्यामुळे येथे मोठ्या मनुष्यबळाची गरज आहे. या देशात वाहनचालकांचीही कमी आहे. त्यामुळे भारतातील (Big News) तरुणांना थेट जर्मनीत जाऊन वाहनचालक होण्याची नामी संधी निर्माण झाली आहे. तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक या चार राज्यांतील तरुणांना वाहनचालकाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे; याबाबत योजना करण्यात आली आहे. त्यामुळे तरुणांना भविष्यात थेट परदेशात नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे; असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com