करिअरनामा ऑनलाईन । काल बारावीचे निकाल लागले आहेत. बऱ्याच यशस्वी विदयार्थ्यांच्या कथा केल्या जात आहेत मात्र अपयशी विद्यार्थ्यांसाठी एक प्रेरणादायी कथा आणि व्यक्ती दोन्ही आम्ही सांगणार आहोत. आयपीएस अनिल पारसकर यांच्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. त्यांना बारावीत एकदा नाही तर दोनदा आले होते अपयश पण अपयश ही यशाची पहिली पायरी असते हे विधान त्यांच्यासाठी अगदी सार्थ ठरले आहे. एका अपयशाने तुमचे करियर संपत नाही त्यामुळे पुढे जोमाने अभ्यास करून यश संपादन करावे असे रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले आहे.
यशस्वी झालेले विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी आयुष्यात आधी आलेल्या अपयशाची माहिती शक्यतो होऊ देत नाहीत. मात्र पारसकर याला अपवाद आहेत. आपण बारावीत दोनदा नापास झालो होतो मात्र अपयशाने खचून न जाता पुन्हा जिद्दीने यशासाठी झगडलो असे त्यांनी सांगितले. परीक्षेत मिळालेले गुण हेच मुलांच्या आयुष्यातील यश असते ही मानसिकता बदलायला हवी असेही त्यांनी सांगितले.
बारावी होणारे पारसकर हे त्यांच्या कुटुंबातील पहिले व्यक्ती होते. त्यानंतर त्यांनी बीएससी ला प्रवेश घेतला. आयएएस होण्याचे स्वप्न घेऊन ते पुण्यात आले त्यांच्या कुटुंबाने देखील त्यांना पाठबळ दिले. बीएससी नंतर त्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरु केली. यूपीएससी च्या तिसऱ्या प्रयत्नांत ते आयपीएस झाले. ते आता अनेकांचे प्रेरणास्रोत आहेत.
नोकरी आणि करिअर अपडेट्स थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमच्या 7821800959 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloNews.
अधिक माहितीसाठी – www.careernama.com
इतर महत्वाच्या बातम्या –
IAS की IPS? कोण आहे सर्वाधिक पाॅवरफुल? जाणुन घ्या पगार अन् सुविधांबाबत सर्वकाही
याला म्हणतात चिकाटी! १६ पूर्व आणि १२ मुख्य परीक्षेनंतर त्याला मिळाले नायब तहसीलदार पद
एसटी कंडक्टरचा मुलगा बनला डेप्युटी कलेक्टर, MPSC परीक्षेत राज्यात दुसरा क्रमांक