करिअरनामा ऑनलाईन । एअर होस्टेसचं आकर्षण कितीतरी (Air Hostess) तरुणींना असतं. सध्या एव्हिएशन इंडस्ट्री मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळेच, एअर होस्टेसच्या मागणीतही वाढ झाली आहे. एअर होस्टेस बनणं हे अनेक तरुणींचं स्वप्न असतं. एअर होस्टेसचं दिसणं, बोलणं, त्यांचं राहणीमान अशा अनेक गोष्टी प्रत्येकालाच आकर्षित करतात. एअर होस्टेस ही केवळ करिअरच्या दृष्टीनेच नव्हे तर पगाराच्या दृष्टीनेही उत्तम नोकरी आहे.
तुमच्यापैकी अनेक तरुणींना एअर होस्टेस होण्याची इच्छा असेल. चला तर मग जाणून घेवूया यासाठी आवश्यक पात्रता काय आहे? निवड कशी होते? पगार किती मिळतो? तसेच जॉब प्रोफाईल कसं असतं याविषयी….
कोण बनू शकतं एअर होस्टेस
एअर होस्टेस होण्यासाठी, सर्वप्रथम किमान इंटरमिजिएट पास किंवा (Air Hostess) एव्हिएशनमध्ये पदवीधर असणे आवश्यक आहे. यासाठी एअर होस्टेस ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेता येते. एअर होस्टेस होण्यासाठी शारीरिक पात्रता देण्यात आली आहे. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची उंची किमान 5 फूट 2 इंच असावी. उमेदवार शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे. तसेच उमेदवाराचे वय 17 ते 26 वर्षांदरम्यान असावे. अर्जाच्या वेळी अविवाहित उमेदवारांना प्राधान्य दिले जाते. एअर होस्टेस होण्यासाठी तुम्ही 12वीनंतर प्रयत्न करू शकता. 12वी पास झाल्यानंतर यासाठी सर्टिफिकेट, डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स करता येतो. या सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा कोर्सेसचा कालावधी सहा महिन्यांपासून एक वर्षांपर्यंत असू शकतो. तर, डिग्री कोर्स तीन ते चार वर्षांचा असतो.
अशी होते निवड (Air Hostess)
एअर होस्टेस भरतीसाठी विमान कंपन्या जाहिरात प्रसिद्ध करतात. यानंतर अर्ज केलेल्या उमेदवारांची लेखी परीक्षा, ग्रुप डिस्कशन आणि पर्सनल इंटरव्ह्यू या टप्प्यांमधून एअर होस्टेसची निवड केली जाते.
एअर होस्टेस होण्यासाठी तुम्ही यासंबंधीत कोर्स करु शकता. यासाठी (Air Hostess) सर्टिफिकेट, डिग्री किंवा डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत. 12वीनंतर हे अभ्यासक्रम करता येतात. प्रमाणपत्र आणि पदविका अभ्यासक्रमाचा कालावधी सहा महिने ते एक वर्षाचा असू शकतो. तर पदवी अभ्यासक्रम तीन ते चार वर्षांचा असतो.
इतका मिळतो पगार
फ्रेशर एअर होस्टेसला सुरुवातीला (Air Hostess) सरासरी 4 ते 5 लाख रुपये वार्षिक पगार मिळतो. पण जसजसा अनुभव वाढत जातो तसा पगारही 13 ते 15 लाखांपर्यंत पोहोचतो.
असं असतं जॉब प्रोफाईल
1. प्री-फ्लाइट ब्रीफिंग दरम्यान प्रवाशांना अभिवादन करणे, त्यांना त्यांच्या जागेवर बसण्यासाठी मार्गदर्शन करणे
2. उड्डाणा दरम्यान प्रवाशांच्या प्रश्नांची उत्तरे देणे
3. प्रवाशांना अन्न आणि पाणी पुरवणे
4. फ्लाइट रिपोर्ट तयार करणे (Air Hostess)
5. आवश्यक असल्यास प्रवाशांना वैद्यकीय सेवा पुरवणे
6. प्रवाशांना सुरक्षिततेच्या प्रक्रियेबद्दल सूचना देणे
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com