AI Universal University : इथे सुरु होतेय देशातील पहिली AI University; ‘या’ तारखेपासून सुरु होणार पहिले शैक्षणिक वर्ष

करिअरनामा ऑनलाईन । Artificial Intelligence ने तंत्रज्ञान (AI Universal University) क्षेत्रात मोठे बदल केले आहेत. या तंत्रज्ञानामुळे जगाचे रूप पालटणार आहे. सध्या या तंत्रज्ञानाच्या वापराने प्रत्येक क्षेत्रात अनेक बदल झाले आहेत. दिवसागणिक विविध क्षेत्रांतील अनेक गोष्टींच्या विकासात आर्टीफिशियल इंटेलिजन्स मोलाचा वाटा उचलत आहे. जेव्हापासून कृत्रिम बुद्धीमत्तेची म्हणजेच AI ची संकल्पना सत्यात उतरली, तेव्हापासून AI लोकांच्या जीवनाचा महत्त्वपूर्ण भाग बनायला लागला आहे.

तंत्रज्ञानाच्या युगात मशीन्सना तोंडी आदेश समजतात, चित्रे ओळखता येतात, कार चालवतात, गेम्स खेळतात आणि मानवांच्या कार्यपद्धतीपेक्षा बरीच कामे करतात. पण AIला माहिती पुरवणारे आणि हे तंत्रज्ञान विकसित करणारे तंत्र शिकण्याची संधी घेण्यासाठी परदेशात जाण्याची गरज नाही. कारण, भारतातील पहिले AI विद्यापीठ तुमच्यासाठी सज्ज झाले आहे.
आर्टीफिशियल इंटेलिजन्स हे तंत्रज्ञान भविष्याच्या (AI Universal University) दृष्टीने फार महत्त्वाचं आहे. या प्रगत तंत्रज्ञानामुळे जग बदलेल असे बोलले जाते. त्यामुळे एआय किंवा संबंधित क्षेत्रांवर प्रभुत्व मिळवल्यास मोठ्या आणि फायदेशीर रोजगाराच्या संधी मिळू शकतात. या पार्श्वभूमीवर देशात पहिल्या AI विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे.

कधी सुरु होणार पहिले शैक्षणिक वर्ष
‘एआय युनिव्हर्सल युनिव्हर्सिटी’ (AI Universal University) असं या विद्यापीठाचे नाव असून दि. 1 ऑगस्टपासून या विद्यापीठाच्या पहिल्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात होणार आहे.
हे विद्यापीठ महाराष्ट्रात मुंबईजवळ कर्जत येथे स्थापन (AI Universal University) करण्यात आले आहे. ग्रीन कॅम्पस असलेल्या या विद्यापीठाला महाराष्ट्र सरकारच्या उच्च तांत्रिक आणि शिक्षण विभागाने मान्यता दिली आहे. भारतातील अशा प्रकारचे हे पहिले विद्यापीठ देशाची आर्थिक राजधानी मुंबईजवळ सुरु झाले आहे.

असा आहे अभ्यासक्रम (AI Universal University)
1. मुंबईजवळील कर्जत येथे दि. 1 ऑगस्टपासून युनिव्हर्सल एआय युनिव्हर्सिटी (Universal AI University) एआय आणि भविष्यातील तंत्रज्ञानातील विशेष पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात येत आहे.
2. या अभ्यासक्रमांतर्गत येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना AI तंत्रज्ञानाबद्दल संपूर्ण माहिती आणि शिक्षण दिले जाणार आहे.
3. यामध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी आणि सुपर कॉम्प्युटरचे शिक्षण अशा गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे.
4. या विद्यापीठात एआय तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी हायटेक क्लास रुम, सुपर कम्प्युटर्स आणि व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे अशी सर्व पातळीवर तयारी करण्यात आली आहे.
5. व्हर्च्युअल रिॲलिटीसह भविष्यातील तंत्रज्ञानाच्या अभ्यासक्रमांचाही यात समावेश करण्यात आला आहे.

विद्यापीठाची वैशिष्ट्ये (AI Universal University)
1. देशातील पहिली AI University महाराष्ट्रात मुंबईजवळील कर्जतमध्ये स्थित आहे.
2. या विद्यापीठामध्ये एआय तंत्रज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानामध्ये विशेष पदवीपूर्व, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.
3. जागतिक घडामोडी, कायदा, पर्यावरण, क्रीडा आणि विज्ञान सोबत व्हर्च्युअल रिॲलिटी आणि सुपर कॉम्प्युटर यांसारख्या नव्या-जुन्या विषयांच्या संमिश्रित अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
4. जग अधिक ऑटोमेशन आणि डिजिटल ट्रान्सफॉर्मेशनकडे वाटचाल करत असताना, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला स्पर्धात्मक राहण्यासाठी AI शिक्षण आणि (AI Universal University) संशोधन महत्त्वाचे ठरणार आहे.
5. AI विद्यापीठात हायटेक क्लास रूम, व्हर्च्युअल रिॲलिटी उपकरणे आणि सुपर कॉम्प्युटर बसवण्यात आले आहेत.
6. प्रत्येक विषय शिकवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचाचा वापर केला जाणार आहे.
7. तरुणांना ऑगमेंटेड रिॲलिटी, मिक्स्ड रिॲलिटी, आयओटी, ब्लॉकचेन शिकण्यासाठी आणि प्रयोग करण्यासाठी विशेष प्रयोगशाळा (लॅब) तयार करण्यात आली आहे.
8.  विद्यार्थ्यांचे तांत्रिक ज्ञान वाढविण्यासाठी विविध साधनांचा वापर करण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com