Agriculture Course Admission 2023 : कृषी अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; पहा महत्वाच्या तारखा

करिअरनामा ऑनलाईन । अभियांत्रिकीनंतर आता कृषी (Agriculture Course Admission 2023) अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. राज्यातील कृषी विद्यापीठासह संलग्न महाविद्यालयांमधील 9 पदवी अभ्यासक्रमांसाठीची ही प्रवेश प्रक्रिया आहे. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

या अभ्यासक्रमांसाठी होतेय प्रवेश प्रक्रिया
कृषी अभ्यासक्रमांसाठी राज्यात एकूण 12 हजार 690 जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांना 9 जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येणार (Agriculture Course Admission 2023) आहे. राज्यातील कृषी विद्यापीठांमधील बी.एस्सी. (ऑनर्स) (कृषी), बी.एस्सी. (ऑनर्स) (उद्यानविद्या), बी.एस्सी. (ऑनर्स) (सामुदायिक विज्ञान), बी.एस्सी. (ऑनर्स) (वनविद्या), बी. एफ्.एस्सी. (मत्स्यविज्ञान), बी. टेक. (कृषी अभियांत्रिकी), बी. टेक. (अन्नतंत्रज्ञान), बी. टेक. (जैवतंत्रज्ञान) आणि बी. एस्सी. (ऑनर्स) (कृषी व्यवसाय व्यवस्थापन) या व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमांच्या पहिल्या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे.

पदवी प्रवेशासाठी आवश्यक किमान पात्रता (Agriculture Course Admission 2023)
1. केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी प्रवेश अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय किमान 16 वर्षे असावे.
2. पात्रता परीक्षेमध्ये (इयत्ता 12 वी विज्ञान) खुल्या गटातील उमेदवारास 50 टक्क्यांपेक्षा कमी आणि आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारास 40 टक्क्यांपेक्षा कमी गुण नसावे. याचबरोबर सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये विद्यार्थ्याना किमान गुण शुन्य पेक्षा जास्त असावेत.

काही महत्वाच्या तारखा
1. ऑनलाईन अर्जासाठी अंतिम मुदत – 9 जुलै 2023
2. तात्पुरती गुणवत्ता यादी – 13 जुलै 2023
3. हरकती सूचना – 14 ते 16 जुलै 2023 (Agriculture Course Admission 2023)
4. अंतिम गुणवत्ता यादी – 20 जुलै 2023
5. पहिल्या फेरीची निवड यादी – 22 जुलै 2023
6. महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेणे – 23 ते 25 जुलै 2023
7. कटऑफ – 26 जुलै 2023
प्रवेशासंबंधी अधिक महितीसाठी येथे CLICK करा – PDF
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com