Agniveer Recruitment 2023 : रेल्वे भरतीत अग्निवीरांना आरक्षण जाहीर; पहा कोणत्या पदासाठी किती आरक्षण?

करिअरनामा ऑनलाईन । रेल्वे भरतीत आता माजी अग्निवीरांना (Agniveer Recruitment 2023) आरक्षण देण्यात येणार आहे. तसेच त्यांना पीईटी परीक्षेतून सूट देण्यात येणार आहे. यासाठी रेल्वे प्रशासन भरतीत 15 टक्के पदे अग्निवीरांसाठी राखीव ठेवणार आहे. यासंदर्भात रेल्वेकडून मार्गदर्शक सूचनाही जारी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी केंद्र सरकारने BSF भरतीत माजी अग्निवीरांना 10 टक्के पदे राखीव ठेवण्याची घोषणा केली होती. निमलष्करी दलातील माजी अग्निवीरांच्या भरतीसाठी ही स्वतंत्र श्रेणी तयार करण्यात येणार आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी नुकतीच संसदेत ही माहिती दिली. एका वृत्त संस्थेने दिलेल्या वृत्तानुसार लेव्हल-1 चतुर्थ श्रेणी पदांमध्ये माजी अग्निवीरांना 10 टक्के आणि लेव्हल-2 पदांमध्ये 5 टक्के आरक्षण देण्यात येणार आहे.

वय मर्यादा होणार शिथिल (Agniveer Recruitment 2023)
रेल्वेकडून घेण्यात येणाऱ्या या भरतीमध्ये माजी अग्निवीरांना पहिल्या तुकडीला वय मर्यादेत 5 वर्षांची सूट देण्यात येणार आहे. त्यानंतर माजी अग्निवीरांच्या दुसऱ्या माजी तुकडीला वयोमर्यादेत 3 वर्षांची सूट देण्यात येणार आहे.
पीईटी परीक्षा नाही
रेल्वेकडून या भरतीत लेव्हल-1 आणि लेव्हल-2 पदांसाठी (Agniveer Recruitment 2023) अर्ज करणाऱ्या माजी अग्निवीर कर्मचाऱ्यांना पीईटी परीक्षा द्यावी लागणार नाही. माजी अग्निवीरांना केवळ लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.

माजी अग्निवीरांना कोणत्या भरतीसाठी मिळणार आरक्षण?
BSFभरतीत माजी अग्निवीरांना 10 टक्के आरक्षणासह वयोमर्यादेत सूट देण्यात येणार आहे. आता रेल्वेमध्ये लेव्हल-1 पदांच्या भरतीत 10 टक्के आरक्षणासह वयोमर्यादा (Agniveer Recruitment 2023) शिथिल करण्यात येणार आहे.
भारतीय लष्कराच्या तिन्ही शाखांमध्ये चार वर्षांसाठी युवकांची भरती करण्यासाठी गेल्या वर्षी अग्निवीर योजना सुरू करण्यात आली होती. त्याअंतर्गत अग्निवीरांची भरती केली जात आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com