B.Sc. Nursing Admission 2024 : भारतीय सैन्यात B.Sc नर्सिंग प्रवेशासाठी अर्ज सुरू

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या (B.Sc. Nursing Admission 2024) उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय सैन्याने NEET UG मध्ये पात्र उमेदवारांसाठी B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेशासाठी अर्ज सुरू केले आहेत. वैद्यकीय क्षेत्रासोबतच भारतीय सैन्यात सेवा करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्याची अंतिम मुदत 7 ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार भारतीय लष्कराची अधिकृत वेबसाइट joinindianarmy.nic.in ला भेट देऊन विहित तारखांमध्ये ऑनलाइन फॉर्म भरू शकतात.

भारतीय लष्कर B.Sc नर्सिंगसाठी पुणे, कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, लखनौ आणि बंगळुरू या संस्थांमध्ये एकूण 220 रिक्त जागांवर प्रवेश दिला जाईल.
काय आहे आवश्यक पात्रता –
1. आर्मी B.Sc नर्सिंगमध्ये प्रवेश घेण्यासाठी उमेदवार NEET UG 2024 परीक्षेत पात्र असणे आवश्यक आहे.
2. उमेदवाराने रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजी विषयांसह 12 वी मध्ये किमान 50% गुणांसह परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (B.Sc. Nursing Admission 2024)
3. उमेदवाराचा जन्म 1 ऑक्टोबर 1999 पूर्वी आणि 30 सप्टेंबर 2007 नंतर झालेला नसावा. वरच्या वयात नियमानुसार सूट दिली जाईल.
4. यासाठी फक्त महिला उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत.

अर्ज फी (B.Sc. Nursing Admission 2024) –
1. आर्मी B.Sc नर्सिंग अर्ज भरण्यासाठी अर्जाची फी फक्त सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस श्रेणीतील उमेदवारांनाच जमा करावी लागेल.
2. या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना 200 रुपये शुल्क भरावे लागेल.
3. SC/ST प्रवर्गातील उमेदवार यामध्ये सामील होण्यासाठी विनामूल्य फॉर्म भरू शकतात.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com