करिअरनामा ऑनलाईन । 10 वी, 12 वी चा टप्पा हा (Top Hotel Management Colleges in India) विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा समजला जातो. 10 वी किंवा 12 वी नंतर योग्य क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी नक्की कोणत्या दिशेने प्रवास करायचा याबाबत अनेक विद्यार्थी संभ्रमात असतात. हा विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करण्याविषयी आज आपण माहिती घेणार आहोत. 12 वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही जर हॉटेल मॅनेजमेंट या क्षेत्रात शिक्षण घेतले तर चांगले पैसे कमावू शकता. तुम्हाला 5 स्टार हॉटेल्समध्ये चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. तसेच तुम्हाला इतर हॉटेल मध्येही नोकरी मिळू शकते. हॉटेल मॅनेटमेंटचं शिक्षण घेण्यासाठी चांगली कॉलेजेस कोणती आहेत याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.
1. दिल्ली इन्स्टिट्यूट ऑफ हॉटल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नोलॉजी (DIHM) –
या कॉलेजची स्थापना 1983 मध्ये झाली होती. भारतातील अत्यंत बेस्ट हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजच्या यादीत DIHM दिल्ली या संस्थेला विशेष स्थान देण्यात आले आहे. याठिकाणी तुम्ही डिप्लोमा, पदवी तसेच पदव्युत्तर पदवी तसेच सर्टिफिकेशन कोर्स करू शकता.
2. द हॉटल स्कूल – (Top Hotel Management Colleges in India)
‘द हॉटल स्कूल’ याची स्थापना 2011 मध्ये झाली आहे. हे कॉलेज नवी दिल्लीच्या कापसहेडा याठिकाणी आहे. या संस्थेला
TISS-SVE कडून सतत दोन वर्षांपासून अॅचिव्हर ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित केलं जात आहे. अशा प्रतिष्ठित शिक्षण संस्थेतून तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेतले तर निश्चित तुम्हाला लाखो रुपये पगाराची नोकरी मिळू शकते.
3. जामिया मिलिया इस्लामिया –
या कॉलेजची स्थापना 1920 मध्ये झाली होती. जर तुम्हाला एका चांगल्या कॉलेजमधून हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घ्यायचे असेल तर हा पर्याय निश्चितच तुमच्यासाठी योग्य ठरू शकतो. तुम्ही जामिया मिलिया या संस्थेत प्रवेश घेऊन तुमच्या करिअरला कलाटणी देवू शकत. याठिकाणी तुम्ही हॉटेल मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा, पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेऊ शकता.
4. IHM Delhi –
या कॉलेजची स्थापना 1962 मध्ये झाली होती. इन्स्टिट्यूट ऑफ हॉटल मॅनेजमेंट केटरिंग अँड न्यूट्रीशन कॉलेज हे दिल्लीतील एक प्रसिद्ध कॉलेज आहे. भारत सरकारच्या वतीने हे कॉलेज (Top Hotel Management Colleges in India) सुरू करण्यात आले आहे. प्लेसमेंटचा विचार केला असता 2019 मध्ये 100 टक्के विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाले होते. या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठी एनसीएचएमसीटी जेईई (NCHMCT JEE) ही परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा पास झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशासाठी पात्र ठरतात. याठिकाणी तुम्हाला हॉस्पिटॅलिटीच्या क्षेत्रात डिप्लोमा, पदवी तसेच पदव्युत्तर पदवीचे शिक्षण दिले जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com