करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही 12वी कॉमर्स पास झाला असाल (Career After 12th) आणि तुम्हाला तुमचे भविष्य सुधारायचे असेल तर त्यासाठी तुम्ही सीए सीएस इ.ची तयारी सुरू करू शकता परंतु यासाठी तुम्हाला अभ्यासात कठोर परिश्रम घ्यावे लागतील. याशिवाय तुम्ही इतर पर्यायांसह सरकारी नोकऱ्यांसाठीही तयारी करू शकता. या वर्षी, वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना आता अशा अभ्यासक्रमात प्रवेश घ्यायचा आहे जेणेकरून ते त्यांच्या भविष्याचा पाया भक्कम करु शकतील. आज आपण कॉमर्समधून 12वी केलेल्या विद्यार्थ्यांसाठी काही पर्याय सांगणार आहोत. याचा अवलंब केल्यास तुम्हाला नक्कीच चांगले भविष्य, प्रसिद्धी आणि लाखोंचा पगार मिळू शकेल यात शंका नाही.
चार्टर्ड अकाउंटंट (CA)
चार्टर्ड अकाउंटंटला CA म्हणून ओळखले जाते. सीए होण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सीए होण्यासाठी विद्यार्थ्यांना कठोर परिश्रम करावे (Career After 12th) लागतील कारण यासाठी तुम्हाला अनेक परीक्षांना सामोरे जावे लागेल. CA चे काम ऑडिट अकाउंट्स, टॅक्स, वर्क अकाउंटिंग, आर्थिक सल्ला इत्यादींचे विश्लेषण करणे आहे. सीए होण्यासाठी तुम्हाला बारावीनंतर ४ वर्षे लागतील. सीए झाल्यानंतर तुमचा पगार काही वर्षात लाखांपर्यंत पोहोचतो.
कंपनी सचिव (Company Secretary)
सीएस (Company Secretary) होण्यासाठी तुम्हाला खडतर परीक्षेला सामोरे जावे लागते. त्यामुळे तुम्ही अभ्यासात पूर्णपणे झोकून देऊनच तयारी सुरू करा.
बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन (BBA)
वाणिज्य शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्यांनाही हा अभ्यासक्रम (Career After 12th) करता येईल. BBA हा तीन वर्षांचा पदवी स्तरावरील अभ्यासक्रम आहे ज्या अंतर्गत व्यवसाय व्यवस्थापन आणि प्रशासन शिकवले जाते. हा कोर्स केल्यानंतर तुम्हाला खाजगी क्षेत्रात सहज नोकरी मिळू शकते. वाढत्या अनुभवामुळे तुम्हाला या क्षेत्रात लाखोंमध्ये पगार मिळू शकतो.
अन्य पर्याय (Career After 12th)
या पर्यायांव्यतिरिक्त, तुम्ही इव्हेंट मॅनेजर, बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स, बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज (बीएमएस), कॉस्ट अँड मॅनेजमेंट अकाउंटंट (सीएमए), सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर इत्यादी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकता. हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला खाजगी क्षेत्रात चांगल्या पॅकेजमध्ये सहज नोकरी मिळेल. या सर्वांसह, तुम्ही 12वी नंतर बँकिंग क्षेत्रातील अशा सरकारी नोकऱ्यांसाठी देखील तयारी करू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com