करिअरनामा ऑनलाईन । दरवर्षी, अनेक उमेदवार अनेक अडथळे (UPSC Success Story) आणि आव्हानांना न जुमानता UPSC नागरी सेवा परीक्षा पास करतात. UPSC ही भारतातील सर्वात कठीण परीक्षा मानली जाते. त्यामुळे उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यासाठी अनेक वर्षे लागतात. आमच्याकडे अनेक उमेदवारांची उदाहरणे आहेत ज्यांनी त्यांच्या चाकोरी बाहेर जावून अभ्यास करून IAS/IPS परीक्षा पास केली आहे. अशीच एक प्रेरणादायी कहाणी आहे नेहा भोसलेची (IAS Neha Bhosle), जिने UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली आहे. नेहा तिच्या कर्तृत्वामुळे आणि ती करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत यशस्वी होण्याच्या तिच्या अतूट इच्छेमुळे सर्वांसाठी मार्गदर्शक ठरली आहे.
कोण आहे नेहा भोसले? (UPSC Success Story)
नेहा भोसलेचा जन्म मुंबईचा आणि तिचे शिक्षणही मुंबईतच झाले. ती पहिल्या पासूनच अभ्यासात हुशार होती. तिने विज्ञान शाखेतून 11वी आणि 12वी पास केली आहे. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर तिने मुंबई विद्यापीठातून अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे.
CAT परीक्षेत मिळवले 99 टक्के
अभियांत्रिकीची पदवी पूर्ण केल्यानंतर नेहाने सामायिक प्रवेश परीक्षेत (CAT) 99.36 टक्के गुण मिळविले आणि एमबीए (MBA) करण्यासाठी तिने प्रतिष्ठित IIM लखनौ या संस्थेत प्रवेश मिळवला. नेहाने एमबीएनंतर भारतीय कॉर्पोरेशनमध्ये तीन वर्षे काम केले.
UPSC करताना अपयशाकडून यशाकडे वाटचाल
नोकरीच्या काळातच नेहाला यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस (UPSC Success Story) परीक्षा उत्तीर्ण होण्याची आवड निर्माण झाली. त्यामुळे तिने UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. कॉर्पोरेशनमध्ये ती पूर्णवेळ नोकरी करत होती. नोकरी करत असताना 2017 मध्ये तिने पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात ती आयएएस (IAS) परीक्षा पास होऊ शकली नाही. पण न खचता तिने पुन्हा परीक्षा देण्याचा निर्धार केला.
नोकरीचा राजीनामा देऊन अभ्यासावर लक्ष केंद्रित केले (UPSC Success Story)
2017 मध्ये परीक्षेत अपयश आल्यानंतर नेहाने पुन्हा कंबर कसली. यावेळी तिने नोकरीचा राजीनामा देण्याचं ठरवलं आणि संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केलं. याचा परिणाम असा झाला की 2019 मध्ये नेहाने तिसऱ्या प्रयत्नात UPSC CSE मध्ये संपूर्ण भारतातून 15 वा क्रमांक मिळवला आणि ती IAS अधिकारी बनली. IAS नेहा भोसले सध्या नांदेड, महाराष्ट्रातील ITDP-किनवटच्या सहाय्यक जिल्हाधिकारी आणि PO आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com