UPSC Success Story : मॉडेलपेक्षा कमी नाही हिचं सौंदर्य; पहिल्याच प्रयत्नात बनली IFS अधिकारी

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । पश्चिम बंगालच्या उत्तर परगणा जिल्ह्यातील (UPSC Success Story) रहिवासी असलेल्या तमाली साहा (IFS Tamali Saha) या तरुणीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी (UPSC) सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा पास केली आहे. तिचं वय अवघं 23 वर्षे आहे. तिची आता भारतीय परराष्ट्र सेवा (Indian Foreign Services) अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भारतातील सर्वात कठीण परीक्षांबद्दल बोलायचे झाले तर यूपीएससी परीक्षा अव्वल स्थानावर येते. दरवर्षी सुमारे लाखो उमेदवार या परीक्षेसाठी अर्ज करतात, परंतु त्यापैकी काही मोजकेच जण या परीक्षेत पास होऊ शकतात आणि देशातील सर्वात प्रतिष्ठित समजले जाणारे पद मिळवतात. यापैकी एक तरुण उमेदवार आहे तमाली साहा… ही तरुण अधिकारी बॉलिवूड अभिनेत्रींनाही सौंदर्यात मागे टाकते. आज आपण तिच्या करिअरच्या प्रवसाविषयी जाणून घेणार आहोत…

विना कोचिंग केला अभ्यास (UPSC Success Story)
स्पर्धा परीक्षेसाठी लाखो उमेदवार अनेक वर्षांपासून कोचिंग घेऊन सतत प्रयत्न करतात, मात्र तरीही त्यांना परीक्षेत यश मिळवता येत नाही. पण काही उमेदवार असे आहेत जे कोणत्याही प्रशिक्षणाशिवाय पहिल्याच प्रयत्नात ही परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनतात. असंच एक उदाहरण आहे तमाली साहा या तरुणीचं; जिने 2020 मध्ये तिचे पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर ती त्याच वर्षी यूपीएससी आयएफएस परीक्षेला बसली. या परीक्षेत तिने पहिल्याच प्रयत्नात ९४ वा क्रमांक पटकावला. 2021 मध्ये, ती वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी IFS अधिकारी बनली आणि तिला पश्चिम बंगाल केडर देण्यात आले.

मिळवलं देशातील प्रतिष्ठित पद
तमाली ही पश्चिम बंगाल येथील मूळ रहिवासी आहे. तिचे शालेय शिक्षण तिच्या गावीच झाले. यानंतर तिने कलकत्ता विद्यापीठातून प्राणीशास्त्र विषयात पदवी प्राप्त केली. पदवीचे (UPSC Success Story) शिक्षण घेत असतानाच तमालीने यूपीएससी परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. 2020 तिने पहिल्याच प्रयत्नात UPSC भारतीय परराष्ट्र सेवा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली. परिणामी, तिची भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे देशातील प्रतिष्ठित पद समजले जाते. तमालीच्या कामगिरीने तिचे कुटुंब, मित्र परिवाराला तिचा अभिमान वाटतो. नागरी सेवक म्हणून सेवा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या असंख्य इच्छुक उमेदवारांसाठी ती प्रेरणा ठरत आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com