Career Mantra : आर्ट्समधून 12 वी पास झालेल्यांसाठी करिअरचे भरपूर पर्याय उपलब्ध

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या (Career Mantra) पालकांच्या मनात सर्वात मोठा प्रश्न असतो की आता करिअरला कोणत्या क्षेत्राच्या दिशेने वळवायचे याबाबत. अशातही विद्यार्थी कला शाखेतून 12वी पास होणार असेल तर चांगले करिअर कसे होईल, याची चिंता विद्यार्थ्यांना अधिकच सतावते. पण तुम्हाला माहित आहे का? कला शाखेतून 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना इतर क्षेत्रांच्या तुलनेत चांगले भविष्य घडवण्याच्या अधिक संधी आहेत. असे विद्यार्थी अध्यापन, कायदा, वैद्यकीय, व्यवस्थापन, पत्रकारिता आदी क्षेत्रात करिअर करू शकतात. या क्षेत्रात करिअर करण्यासाठी तुम्ही बारावीनंतरच उपलब्ध अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊ शकता आणि तुमच्या भविष्याला नवी दिशा देऊ शकता.

12 वीनंतर करा ‘हा’ कोर्स (Career Mantra)
जर तुम्हाला अध्यापन क्षेत्रात रस असेल तर 12वी नंतर तुम्ही 4 वर्षाच्या BA B.Ed, B.Sc B.Ed, B.El.Ed, D.El.Ed अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन पुढे जाऊ शकता. याशिवाय कला शाखेत बीए केल्यानंतर उच्च शिक्षण घेतल्यानंतर सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठीही अर्ज करू शकता.

कायदा किंवा व्यवसाय व्यवस्थापनातही होवू शकते करिअर (Law or Business Administration)
जर तुम्ही कला शाखेतून 12वी पास होणार असाल तर तुम्हाला (Career Mantra) कायद्याच्या क्षेत्रातही करिअर करण्याची संधी आहे. यासाठी आता तुम्ही 12वी नंतर लगेचच बीए-एलएलबी (BALLB) या 5 वर्षाच्या एकात्मिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता. याशिवाय कायद्यात करिअर करण्यासाठी तुम्ही प्रथम बीए करू शकता आणि एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ शकता.
कायद्याव्यतिरिक्त, तुम्ही बीबीए (बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन), बीएमएस (बॅचलर ऑफ बिझनेस स्टडीज), बीएचएम (बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट), रिटेल मॅनेजमेंट (डिप्लोमा) यासारख्या व्यवस्थापन क्षेत्रातील अभ्यासक्रमांनाही प्रवेश घेऊ शकता.

पत्रकारितेच्या क्षेत्रातही घडू शकते करिअर (Career Mantra)
जर तुम्हाला वृत्त लेखन, रिपोर्टिंग, अँकरिंग, कंटेंट रायटिंगमध्ये रस असेल तर तुम्ही पत्रकारितेचा (Journalism) कोर्स करू शकता. यामध्ये पदवी आणि पदविका दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 12वी नंतर तुम्ही BJMC (बॅचलर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन) करू शकता. BJMC नंतर तुम्ही उच्च शिक्षणासाठी MJMC (मास्टर ऑफ जर्नालिझम अँड मास कम्युनिकेशन) पदवी देखील मिळवू शकता. याशिवाय तुम्ही या क्षेत्रात डिप्लोमा कोर्सही करू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com