करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक (MPSC Update) मोठी अपडेट जारी केली आहे. पोलिस उपनिरीक्षक संवर्गासाठीची शारीरिक चाचणी अखेरीस पुढे ढकलण्यात आली आहे. तयारीसाठी अपुरा कालावधी आणि उन्हाचा वाढता तडाखा आणि महिला उमेदवारांसाठी बदललेल्या निकषामुळे तयारीसाठी पुरेशा वेळेची मागणी करण्यात आली होती; या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
महिला उमेदवारांना दिलासा
शारीरिक चाचणी पुढे ढकलल्याने महिला उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. MPSCकडून महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२२ या परीक्षेतीस पोलीस उपनिरीक्षक (PSI) संवर्गाकरीता १५ एप्रिल २०२४ ते २ मे २०२४ या कालावधीत शारीरिक चाचणी आयोजित केली होती; परंतु लोकसभा (MPSC Update) निवडणुकीमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे MPSC ने जाहीर केले आहे. मात्र शारीरिक चाचणी कधी घेतली जाणार याबाबत तारीख मात्र जाहिर केली नाही. सुधारित सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल; असे MPSCने जाहीर केलेल्या घोषणा पत्रकात नमूद केले आहे.
पीएसआयच्या शारीरिक चाचणीच्या निकषांमध्ये २०२१ मध्ये बदल करण्यात आला होता. उमेदवारांना तयारीसाठी एक वर्ष मिळाले असतानाही त्यावर्षी ११२ जागांपैकी फक्त ६४ मुली पात्र ठरल्या होत्या. आता तर फक्त एक महिन्याचाच कालावधी मिळाला आहे. १३ मार्च रोजी मुख्य परीक्षेचा निकाल लागला होता.
उनाच्या तडाख्यात मैदानी चाचणीची तयारी करणे अशक्य (MPSC Update)
एका महिन्यातच शारीरिक चाचणीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. नवे निकष महिला उमेदवारांसाठी बदलले असून, इतर राज्यांच्या तुलनेत ते अवघड आहे. अपुऱ्या वेळेत आणि वाढत्या उन्हाळ्यात ही तयारी करणे जवळपास अशक्य आहे. महिला उमेदवारांचा मागील भरतीत टक्का घसरला आहे. तसेच २०१५ ते २०२१ या दरम्यान कधीही एमपीएससीने भर उन्हाळ्यात अशा प्रकारची परीक्षा घेतली नाही. परीक्षा कालावधी जरी सकाळचा असला तरीही त्यासाठी लागणारा सराव दररोज उन्हात करावा लागत आहे, असेही उमेदवारांचे म्हणणे होते.
अवघ्या एका महिन्यात मैदानी चाचणी होणार होती, त्यामुळे आता ही चाचणी पुढे ढकलल्याने उमेदवारांना मोठा दिलासा मिळणार आहे. एमपीएससीने विद्यार्थ्यांना परीक्षांची तयारी करण्यासाठी पुढे ढकलेल्या परीक्षांच्या तारखा लवकरात लवकर जाहीर कराव्यात; अशी मागणी उमेदवारांमधून होत आहे.
एमपीएससीने यापूर्वी लोकसभा निवडणुकांमुळे PSIची शारीरिक चाचणीची १५ ते २७ एप्रिल दरम्यान आयोजित केली होती. तसेच १९, २६ आणि २७ एप्रिल रोजी होणारी शारीरिक (MPSC Update) चाचणीची परिक्षा ही २९, ३० एप्रिल आणि ०२ मे २०२४ रोजी पोलीस मुख्यालय नवी मुंबई येथे होणार असल्याचे जाहीर केले होते. यावर उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांनी मैदानी चाचणी घेणे शक्य नसल्याचे कारण देत ती पुढे ढकलली आहे. लोकसभा निवडणुकीमुळे पोलिसांसह सरकारी कर्मचाऱ्यांना निवडणुकीचे कामकाज दिले जाते. याची प्रत्येक विभागाल माहिती असते. तरी देखील एमपीएससीने कोणतेही नियोजन न करता सरसकट ताराख जाहीर करुन ढिसाळ नियोजनाचे प्रदर्शन केले; असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
पीएसआय पदाची मैदानी चाचणी पुढे ढकलण्याची मागणी महिला (MPSC Update) उमेदवारांनी केली होती. त्याला नकार देत एमपीएससीने नवीन तारखा जाहीर केल्या होत्या. मात्र विशेष पोलीस उपमहानिरीक्षक यांच्या आदेशाने का होईना मैदानी चाचणी पुढे ढकलली, यामुळे तरी आता या उमेदवारांना मोठा दिलासा मिळेल; असा विश्वास स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे कार्याध्यक्ष महेश घरबुडे यांनी व्यक्त केला आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com