करिअरनामा ऑनलाईन । सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय (UPSC Preparation Tips) असणाऱ्या IAS अधिकारी कृतिका मिश्रा (IAS Kritika Mishra) UPSC परीक्षा देणाऱ्यांसाठी टिप्स शेअर करत असतात. काही दिवसापूर्वी त्यांनी UPSC पूर्व परीक्षेची केवळ 90 दिवसांत तयारी कशी करायची याबाबत टिप्स दिल्या होत्या.
देशातील सरकारी खात्यांमध्ये प्रतिष्ठित पद भूषवण्याची प्रत्येक तरुणाची (UPSC Preparation Tips) इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेबाबत त्यांच्यामध्ये जास्त आकर्षण दिसून येते. ज्या तरुणांना सरकारी अधिकारीव्हायचे आहे ते यूपीएससी परीक्षेची तयारी करताना दिवतात. देशभरातून दरवर्षी लाखो इच्छुक तरुण-तरुणी UPSC परीक्षेला बसतात.
जे उमेदवार यावर्षी नागरी सेवा परीक्षेला बसणार आहेत यांच्यासाठी ही महत्वाची माहिती आहे. जर तुम्हाला या परीक्षेत यश मिळवायचे असेल तर आयएएस अधिकारी (UPSC Preparation Tips) कृतिका मिश्राच्या टिप्स फॉलो करून तुम्ही चांगला अभ्यास करू शकता. फक्त 90 दिवसांमध्ये UPSC चा अभ्यास कसं करायचा याविषयी त्या मार्गदर्शन करतात. या टिप्स निश्चितच तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
टॉपर्सच्या यादीत मिळवलं स्थान (UPSC Preparation Tips)
आयएएस अधिकारी कृतिका मिश्रा या उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील रहिवासी आहेत. 2022 मध्ये झालेल्या UPSC परीक्षेत त्यांनी संपूर्ण भारतातून 66 वा क्रमांक मिळवला होता. यासह त्यांनी यूपीएससी हिंदी मीडियम टॉपर्सच्या यादीत आपले स्थान निर्माण केले आहे. IAS कृतिका मिश्राचा यांची 3 महिन्यांची अभ्यास योजना काय आहे हे जाणून घ्या…
काय आहे IAS कृतिका यांचा 90 दिवसाचा स्टडी प्लॅन?
1. यूपीएससी परीक्षेची तयारी करण्यासाठी, आयएएस अधिकारी कृतिका मिश्रा सुचवतात की योग्य रणनीती बनवण्यापूर्वी, मागील वर्षाच्या प्रश्नांचे (PYQs) अॅनालिसिस करा.
2. NCERT सारख्या मूलभूत पुस्तकांची उजळणी करत राहा, UPSC च्या तयारीत ही पुस्तके महत्वाची आहेत.
3. अनेक प्रश्न या पुस्तकांच्या (UPSC Preparation Tips) बाहेरही विचारले जातात, परंतु अशा अनिश्चित प्रश्नांसाठी, यावेळी कोणत्याही नवीन पुस्तकातून वाचणे शहाणपणाचे नाही.
4. आयएएस कृतिका यांच्यामते करंट अफेअर्सची तयारी नियमितपणे वर्तमानपत्रे वाचूनच चांगली होवू शकते.
5. जर तुम्ही कोणत्याही एका चांगल्या मासिकाचे वार्षिक संकलन वाचले तर तुम्ही संपूर्ण वर्षाचा अभ्यासक्रम कव्हर करू शकता.
6. UPSC परीक्षा देणाऱ्यांनी प्रश्न सोडवण्यापूर्वी त्याचे स्वरूप समजून घेणे आवश्यक आहे. बऱ्याच वेळा तुम्ही तर्क/सामान्य ज्ञान वापरून GS प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता.
7. IAS कृतिका मिश्रा म्हणतात की, UPSC देणाऱ्यांनी मॉक टेस्ट देणे सुरू केले पाहिजे. मॉक टेस्ट दिल्यानंतर इथे होणाऱ्या चुकांमध्ये सुधारणा करणे देखील आवश्यक आहे.
8. उमेदवारांनी अगदी शेवटच्या क्षणी CSAT ची तयारी सुरू करू नये, GS सोबत त्याची तयारी सुरू ठेवावी.
या टिप्स सह उमेदवारांना सल्ला देताना कृतिका सांगतात की, इच्छुकांनी अभ्यास करताना आत्मविश्वास बाळगावा. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी प्रामाणिकपणा आणि आत्मविश्वास खूप महत्त्वाचा आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com