Career in Aviation : एव्हिएशन क्षेत्रात करू शकता करिअर… पायलट होण्यासाठी काय करावं लागतं? इथे मिळेल सर्व माहिती

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी पास झाल्यानंतर तुम्हाला काही (Career in Aviation) चांगले करायचे असेल, परंतु कोणत्या क्षेत्रात जावे याबद्दल जर संभ्रमात असाल तर हा लेख तुमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही पायलट बनू शकता आणि आकाशात उंच उडू शकता. फार कमी लोक या क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करतात; कारण आहे या क्षेत्राबद्दल असलेला माहितीचा अभाव. पायलट झाल्यानंतर तुम्ही लाखो रुपयांपर्यंत कमाई करू शकता. पाहूया या क्षेत्रातील करिअरच्या संधीविषयी…

काय आहे आवश्यक पात्रता
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह किमान 50 टक्के गुणांसह 12वी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर, कोणत्याही एव्हिएशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षा, वैद्यकीय चाचणी आणि मुलाखत उत्तीर्ण करावी लागेल. या सर्व फेऱ्या पार केल्यानंतर तुम्हाला एव्हिएशन इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश मिळतो. येथे, तुम्हाला विमानाशी संबंधित गुंतागुंत शिकवण्याबरोबरच विमान उडवण्याचे पूर्ण प्रशिक्षण दिले जाते.

हवाई दलात भरती होण्याची मिळते संधी
जर तुम्हाला भारतीय हवाई दलात (Indian Air Force) पायलट बनण्याची इच्छा असेल तर 12वी नंतर तुम्हाला UPSC NDA परीक्षा, Air Force Common Admission Test (AFCAT), NCC स्पेशल एंट्री स्कीम परीक्षा उत्तीर्ण करावी लागेल, त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाते. भारतीय हवाई दलात पायलट म्हणून नोकरी मिळविण्यासाठी, तुम्ही संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा देखील देऊ शकता.

कमर्शियल पायलट होण्याची संधी
बारावीनंतर एव्हिएशन इन्स्टिट्यूटमधून प्रशिक्षण घेऊन तुम्ही (Career in Aviation) व्यावसायिक पायलटही (Commercial Pilot) होऊ शकता. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर, तुम्हाला व्यावसायिक पायलट परवान्यासाठी (CPL) फिटनेस चाचणी आणि लेखी परीक्षा द्यावी लागेल. यानंतर, यशस्वी उमेदवार कमर्शियल पायलट म्हणून त्यांचे करिअर सुरू करू शकता.

किती मिळतो पगार?
वायुसेनेत अधिकाऱ्याचा पगार 56,100 रुपयांपासून सुरू होतो, तर कमर्शियल पायलट म्हणून तुम्ही सुरवातीला 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. तुम्ही जसा अनुभव घ्याल त्याप्रमाणे तुमचे उत्पन्नही वाढत जाते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com