Career After 12th : 12 वी नंतर मेडिकल, इंजिनिअरिंग सोडून ‘या’ क्षेत्रातही करता येईल उत्तम करिअर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । 12 वी नंतर काय करायचं? या प्रश्नाचे उतर (Career After 12th) शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. विज्ञान विषय घेऊन 12 वी पास झालाय; पण तुम्हाला डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचे नसेल, तर तुमच्यासाठी करिअरच्या मार्केटमध्ये अनेक ऑफबीट कोर्सेस उपलब्ध आहेत. 12वी सायन्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही UG PG डिप्लोमा/सर्टिफिकेट कोर्स करून डॉक्टर किंवा इंजिनियर होण्याशिवाय एका वेगळ्या क्षेत्रात चांगले करिअर बनवू शकता.

बहुतांश तरुणांना डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हायचं असतं. परंतु काही असे असतात ज्यांना या क्षेत्राकडे वळायचे नाही. सध्या असे अनेक कोर्सेस आहेत जिथे 12 वी सायन्स उत्तीर्ण झाल्यावर प्रवेश (Career After 12th) घेता येतो. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर तुम्ही या क्षेत्रात चांगले करिअरही घडवू शकता. जाणून घेवूया असे पर्याय आणि यातील करिअरच्या संधीविषयी….

1. विज्ञान शिक्षक (Science Teacher)
सायन्स मधून 12वी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्ही अध्यापनाशी संबंधित पदवी किंवा डिप्लोमा करू शकता. हे शिक्षण घेतल्यानंतर तुम्ही प्राथमिक शिक्षक स्तरापासून ते प्राध्यापक स्तरापर्यंत शिकवण्यासाठी सक्षम होऊ शकता. अध्यापन हे क्षेत्र हे सर्वोत्तम मानले जाते आणि यामहीए उत्तम पगारही मिळतो.

2. डेटा वैज्ञानिक (Data Scientist)
गेल्या काही वर्षांत डेटा सायन्स सायंटिस्ट आपल्या देशात खूप लोकप्रिय झाले आहेत. तुम्ही 12 वीनंतर गणित, सांख्यिकी किंवा अभियांत्रिकी या विषयात पदवी मिळवू शकता. यानंतर तुम्ही संबंधित प्रोग्रामिंग भाषा आणि संबंधित कौशल्ये शिकू शकता. यानंतर तुम्हाला यामध्ये प्रमाणपत्र/डिप्लोमा मिळवता येईल. एकदा तुम्ही डेटा सायंटिस्ट झालात की तुम्हाला लाखोत पगार मिळू शकतो.

3. वास्तुविशारद (Architect) (Career After 12th)
वर सांगितलेल्या पर्याया व्यतिरिक्त, जर तुम्ही तुमच्या पीसीएम विषयांसह इंटर पास केले असेल तर तुम्ही आर्किटेक्ट देखील होऊ शकता. या क्षेत्रात UG आणि PG असे दोन्ही अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. हे अभ्यासक्रम पूर्ण करून तुम्ही आर्किटेक्ट म्हणून काम करून लाखोमध्ये कमाई करू शकता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com