Teacher Recruitment : भावी शिक्षकांना दिलासा!! शिक्षक भरती वेग घेणार; ‘पवित्र’वर जाहिरात देण्याची सुविधा उपलब्ध

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । शिक्षक भरतीची प्रतिक्षा करणाऱ्या (Teacher Recruitment) राज्यातील उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.  शिक्षक भरतीसाठी सर्वच व्यवस्थापनांना जाहिरात देण्याची सुविधा पवित्र प्रणालीवर (Pavitra Portal) उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे आता शिक्षक भरतीच्या प्रक्रियेला वेग येणार आहे.
राज्यात पवित्र प्रणालीद्वारे सुरु करण्यात आलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेमुळे या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, खाजगी व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक पद भरतीसाठी शासनाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 मध्ये घेतली होती.

रोस्टर प्रक्रिया झाली सुरु (Teacher Recruitment)
राज्यातील जिल्हा परिषद, नगर परिषद आणि छोट्या स्थानिक संस्थांची रोस्टर प्रक्रिया पूर्ण झाली असल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध झाली आहे. तर काही मोठ्या खाजगी संस्थांची रोस्टर प्रक्रिया सुरू आहे. परिणामी येत्या दहा ते पंधरा दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच खाजगी संस्थांच्या पद भरतीच्या जाहिराती सुरू होतील असे स्पष्ट संकेत मिळाले आहेत.
या चाचणीसाठी नोंदणी केलेल्या 2 लाख 39 हजार 730 उमेदवारांपैकी तब्बल 2 लाख 16 हजार 443 उमेदवारांनी प्रत्यक्ष चाचणी दिली आहे. तर आतापर्यंत 1 लाख 62 हजार 562 उमेदवारांनी शिक्षक भरतीसाठीची स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली असल्याची माहिती शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या एका उमेदवाराने दिली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com