करिअरनामा ऑनलाईन । महात्मा जोतिबा फुले संशोधन आणि (MPSC News) प्रशिक्षण संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चाळणी परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना चक्क 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे उघड झाले आहे. यापूर्वीही महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे प्रकार समोर आले होते.
सरकारी परिक्षेत कॉपीचे प्रकार घडणं, पेपर फुटणे असे (MPSC News) प्रकार वारंवार होत असतात. आता पुन्हा परीक्षेत एका विद्यार्थ्याला 200 गुणांच्या पेपरमध्ये तब्बल 220 गुण दिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाज्योतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महाज्योतीकडून एमपीएससीसाठी (MPSC) घेण्यात आलेल्या चाळणी परीक्षेचा निकाल लावण्यात आला होता. या परीक्षेत अनेक विद्यार्थ्यांना 200 पेक्षा जास्त गुण मिळाल्याचे दिसून येत आहेत. सामान्यीकरण केल्यामुळे हा प्रकार झाल्याचे महाज्योतीने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे. आता सुधारित निकाल प्रसिद्ध करताना प्रारूप निकाल प्रसिद्ध करता येईल; असं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान झालेल्या प्रकरणावर विद्यार्थ्यांचे आक्षेप मागवण्यात येतील आणि पुढील प्रक्रिया पूर्ण झाल्या नंतरच अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल; असे महाज्योतीकडून सांगण्यात आलं आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com