करिअरनामा ऑनलाईन । आपत्कालीन परिस्थितीत लोक अडकल्याने (Career After 12th) त्यांना बाहेर काढण्यासाठी शासन, सैन्य दल, स्वयंसेवी संस्था जीवतोड प्रयत्न करत असतात. इतरांचे संरक्षण करणं आणि त्यांचे योग्य ते पुनर्वसन करणं हा त्यामागचा मूळ हेतू असतो. या क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची गरज नेहमीच भासत असते. नव्या बदलांना सामोरे जात डिझास्टर मॅनेजमेंट (Disaster Management) ही शाखाही अद्ययावत होत आहे. गेल्या काही वर्षांत देशात आपत्तीजनक परिस्थितीत वाढल्याचे दिसून येत आहे. जागतिक स्तरावर देखील अशा आपत्ती उद्भवल्यास अनेक देश एकमेकांना मदतीसाठी पुढे येतात. भारत सरकारने देखील या क्षेत्राकडे विशेष लक्ष दिल्याचे दिसून येते. या क्षेत्रात कौशल्य असणाऱ्या मनुष्यबळाची वाढती गरज लक्षात घेता आगामी काळात यात करिअर करणे फायद्याचे ठरेल हे निश्चित.
असा असतो अभ्यासक्रम
1. नैसर्गिक आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास ती कशी हाताळावी (Career After 12th) यासंबंधी प्रामुख्याने प्रशिक्षण दिले जाते.
2. आपत्कालीन परिस्थितीत निवारा व्यवस्था उभारणे, शेल्टर मॅनेजमेंट, पाण्याची व्यवस्था, अन्न सुरक्षा, प्रथमोपचार, रेस्क्यू मॅनेजमेंट, लाइव्हली रेस्क्यू, जिओ इन्फोर्मेटिक्स, रिमोट सेन्सिंग, जीआयएस प्रणाली या बाबींचा अभ्यासक्रमात समावेश असतो.
3. सध्या विविध शाळा तसेच कॉलेजमध्ये विशेष प्रशिक्षण दिले जाते. काही विषयात स्पेशलायझेशनही करता येते. उदा. मायनिंग, केमिकल डिझास्टर इत्यादी.
ही पात्रता आवश्यक (Career After 12th)
1. या क्षेत्रात प्रमाणपत्र अभ्यासक्रमासाठी किमान 12वी (12th) पास असणे आवश्यक आहे. सेंटर फॉर डिझॅस्टर मॅनेजमेंट येथील अभ्यासक्रमासाठी प्रवेश परीक्षा घेतली जाते आणि त्यानंतर मुलाखतीचा टप्पा पार करावा लागतो.
2. एम.ए. इन डिझॅस्टर मॅनेजमेंट, एम.एस्सी. इन डिझॅस्टर मॅनेजमेंट हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. कला शाखेतील विद्यार्थ्यांना एम.ए. सोशल वर्क, सोशल सायन्स यानंतर हा अभ्यासक्रम पूर्ण करता येतो.
शालेय अभ्यासक्रमात समावेश
केंद्र सरकारने डिझॅस्टर मॅनेजमेंट हा विषय शाळा आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात समाविष्ट केला आहे. सन २००३ मध्ये सीबीएसई अभ्यासक्रमात इयत्ता आठवीच्या पाठ्यक्रमात हा विषय अंतर्भूत करण्यात आला आहे. आता उच्च शिक्षणातही या विषयाला अग्रक्रमाने प्राधान्य दिले जाते.
इथे मिळते नोकरीची संधी
हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर शासकीय नोकरी (Career After 12th) करता येते. तसेच, आपत्कालीन सेवा देणाऱ्या संस्थांमध्येही तुम्हाला काम मिळते. लॉ इन्फोर्समेंट, रिलीफ एजन्सीज, स्वयंसेवी संस्था, युनायटेड नेशनसारख्या आंतरराष्ट्रीय एजन्सीज, रेडक्रॉस, यूएनए प्रतिष्ठान, केमिकल, मायनिंग, पेट्रोलियम कंपन्या अशा ठिकाणी नोकरीच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com