Career After 12th : 12वी नंतर तुम्ही होवू शकता ‘पुरातत्वशास्त्रज्ञ’; कोणता करायचा कोर्स? कुठे मिळते नोकरी? 

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । जर तुम्ही इतिहास विषयातून (Career After 12th) बारावी केली असेल आणि करिअरचा वेगळा पर्याय शोधत असाल तर आज आम्ही तुम्हाला अशाच एका पर्यायाबद्दल सांगणार आहोत. ‘पुरातत्वशास्त्रात’ करिअरची करण्याची चांगली आहे. इतिहास शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या क्षेत्रात मोठी संधी आहे. आता अशा परिस्थितीत तुमची इच्छा असेल तर तुम्ही ‘पुरातत्वशास्त्रज्ञ’ म्हणून तुमचे करिअर करू शकता. पुरातत्व (Archeology) विषयात पदवी आणि पदव्युत्तर अशा दोन्ही स्तरांवर अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. उमेदवाराला हवे असल्यास तो यामध्ये डिप्लोमा पर्यंतही शिक्षण घेवू शकतो. या क्षेत्रात तुम्हाला कशाप्रकारे करिअर घडवता येवू शकते; याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेवूया…

पुरातत्वशास्त्र या क्षेत्रात शिक्षण घेण्यासाठी उमेदवारांसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह पदविका अभ्यासक्रमांच्या स्तरावरही (Career After 12th) अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार हे अभ्यासक्रम निवडू शकतात. हे अभ्यासक्रम देशातील विविध मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये चालवले जातात, ज्यांची माहिती पोर्टलवरुन मिळवता येवू शकते.

काय आहे पुरातत्वशास्त्र (Archaeologists)
वैज्ञानिक दृष्टिकोनातून जुन्या सभ्यता आणि संस्कृतीचा अभ्यास करणे आणि त्याचा शोध घेणे याला पुरातत्वशास्त्र असे म्हणतात.
काय असतं पुरातत्वशास्त्रज्ञाचे काम
पुरातत्वशास्त्रज्ञाचे काम इतिहासाचे जतन करणे तसेच ते शोधणे हे आहे. यासोबतच ते ऐतिहासिक वस्तू आणि सभ्यता यांचा शोध घेतात. आधुनिक संग्रहालयांचे (Modern Museum) संरक्षणही पुरातत्वशास्त्रज्ञाकडे सोपवले जाते.

कोण कोणते अभ्यासक्रम आहेत उपलब्ध (Career After 12th)
या क्षेत्रातील उमेदवारांसाठी विविध अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. 12वीमध्ये इतिहास (History) विषय उत्तीर्ण झालेले विद्यार्थी पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह पदविका अभ्यासक्रमांच्या स्तरावरील अभ्यासक्रम निवडू शकतात. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास तुम्ही डिप्लोमा पर्यंतही शिक्षण घेवू शकता. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार हे अभ्यासक्रम निवडू शकतात. देशातील विविध मान्यताप्राप्त विद्यापीठांमध्ये हे अभ्यासक्रम चालवले जातात.
पुरातत्वशास्त्रज्ञाकडे ही कौशल्ये असावीत
1. संयम (Control)
2. सर्जनशीलता (Creativity)
3. संघ कार्य (Team Work)
4. विश्लेषणात्मक कौशल्य (Analytical Skills)
5. संभाषण कौशल्य (Communication Skills)

इथे आहे नोकरी मिळण्याची संधी
पुरातत्वशास्त्राचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उमेदवारांना नोकरीच्या पर्यायांची कमतरता भासणार नाही. त्यांची इच्छा असल्यास, ते प्रामुख्याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, नवी दिल्ली (Delhi) येथे असलेल्या भारतीय पुरातत्व सर्वेक्षणात काम करू शकतात. त्यासाठी वेळोवेळी भरती (Career After 12th) होत असते. यासोबतच विविध संग्रहालयांमध्ये भरतीही होत असते. त्याची माहिती संबंधित पोर्टलवरून मिळवली जाऊ शकते. यासोबतच खासगी स्तरावरील नोकऱ्यांसाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com