UPSC Success Story : खाजगी कंपनीत नोकरी; घरुनच केला अभ्यास; इशिता किशोर देशात ठरली UPSC टॉपर

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । केंद्रीय लोकसेवा आयोगाने सिव्हिल (UPSC Success Story) सर्व्हिसेस परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाने आज नागरी सेवा 2022 चा निकाल जाहीर केला आहे. यावर्षी यूपीएससी टॉपर्सच्या यादीत टॉप 10 मध्ये 6 मुली आहेत; तर इशिता किशोरने संपूर्ण भारतात अव्वल क्रमांक मिळवला आहे.
दिल्लीच्या श्री राम कॉलेजची विद्यार्थिनी
इशिता किशोर ही नवी दिल्लीच्या श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्सची विद्यार्थिनी आहे. येथून तिने अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. UPSC देताना पर्यायी विषय निवडताना तिने (UPSC Success Story) राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे पर्यायी विषय घेऊन परीक्षा पास केली आहे. ईशीताला अभ्यासासोबत खेळाची आवड असल्याचे समजते.

खासगी कंपनीत नोकरी करत केला अभ्यास
एका मुलाखतीत इशिताने सांगितले की, ती ग्रॅज्युएशननंतर एका खासगी कंपनीत नोकरी करत आहे. नोकरीसोबतच तिने यूपीएससीची तयारी केली आहे. यासाठी सुरुवातीपासूनच तिने राज्यशास्त्र आणि जागतिक संबंधांवर लक्ष केंद्रित केले.
तिसऱ्या प्रयत्नात मिळालं यश (UPSC Success Story)
इशिता किशोरचे वडील एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत. त्यांचे संपूर्ण कुटुंब ग्रेटर नोएडामध्ये राहते. इशिताने 2014 मध्ये बाल भारतीमधून तिचे 12 वी पर्यंतचे पूर्ण केले, त्यानंतर तिने 2017 मध्ये श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून इकॉनॉमिक्स ऑनर्ससह पदवी पूर्ण केली. यूपीएससी परीक्षेतील तिचा हा तिसरा प्रयत्न होता.

वडिलांचा आदर्श डोळ्यासमोर
इशिता आज निकालाची वाट पाहत होती, पण ती ऑल इंडिया टॉपर होईल याची तिला कल्पना नव्हती. निकाल लागताच तिचे नाव सर्वत्र पसरले. ही गोष्ट तिने आईला सांगितल्यावर तीची आईही आनंदाने नाचू लागली. इशिताने सांगितले की, माझे वडील एअरफोर्समध्ये अधिकारी आहेत. मी माझ्या (UPSC Success Story) वडिलांना नेहमीच देशसेवेसाठी तत्पर राहताना पाहिले आहे. म्हणूनच माझ्या वडिलांना पाहून मला लहानपणीच विचार आला होता की, मी मोठी झाल्यावर देशहिताचे  काम करेन, जेणेकरून मला माझ्या वडिलांप्रमाणे देशाची सेवा करता येईल.
घरातूनच केला अभ्यास 
इशिताने सांगितले की, तिने यूपीएससीसाठी घरी राहूनच अभ्यास केला. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे तिचे  वैकल्पिक विषय होते. तिचा हा तिसरा प्रयत्न होता, त्यामुळे (UPSC Success Story) यावेळी निश्चित पास होईन; असे तिला वाटायचे. इशिता सांगते; ”पहिल्या 2 परीक्षांचा अनिभव पाठीशी होता. परीक्षेसाठी खूप मेहनतही केली होती. हा परीक्षेचा तिसरा प्रयत्न होता;  त्यामुळे यंदा पास होणार याची मला खात्री होती.”
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com