करिअरनामा ऑनलाईन । जगातील प्रसिद्ध सुपर मॉडेल (Career in Modeling) नाओमी कॅम्पबेलचा जन्म 70 च्या दशकात झाला होता. तिने वयाच्या 15 व्या वर्षी मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केला. नाओमीला फॅशन इंडस्ट्रीतील तिच्या पिढीतील 6 सुपरमॉडेल्सपैकी एक म्हटले जाते. तिने 90 च्या दशकात मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. नाओमीचे उदाहरण देवून आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की तेव्हापासून फॅशन इंडस्ट्रीत किती मोठा फरक पडला आहे. आता मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी अनेक मॉडेलिंग आणि फॅशन इन्स्टिट्यूट उपलब्ध आहेत. आजही मॉडेलिंगमध्ये करिअर करणे आव्हानात्मक असले तरी महिला आणि पुरुष दोघांसाठी इथे समान संधी आहेत. आजच्या युगात मॉडेल बनण्यासाठी तुमचे किती शिक्षण झाले पाहिजे, तसेच मॉडेलिंगसाठी आणखी कोणते गुण तुमच्याकडे असावेत, कोणत्या इन्स्टिटयूट मधून तुम्ही मॉडेलिंगचे प्रशिक्षण घेवून तुमचे करिअर करु शकता; हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मॉडेलिंगसाठी आवश्यक कौशल्ये (Career in Modeling)
मॉडेलिंग हे असेच एक करिअर आहे जिथे तुम्हाला ग्लॅमर, चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीत नाव आणि ओळख निर्माण करण्याची संधी मिळते. तसेच तुम्हाला चांगली कमाई देखील करता येते. मॉडेलिंग क्षेत्रात शरीरयष्टी, लूक आणि स्मार्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. ही कौशल्ये कंपनीच्या जाहिराती, टीव्ही, चित्रपट आणि फॅशन डिझायनिंगच्या जगात उपयुक्त आहेत.
या प्रकारे फॅशन मॉडेलिंगमध्ये करिअर करता येते
1. टेलिव्हिजन मॉडेलिंग – यामध्ये तुम्हाला मूव्ही कॅमेऱ्यांसमोर मॉडेलिंग करावे लागेल. जे टीव्ही जाहिराती, चित्रपट, व्हिडिओ, इंटरनेटमध्ये वापरले जाते.
2. प्रिंट मॉडेलिंग – यामध्ये स्टिल फोटोग्राफर मॉडेल्सची छायाचित्रे घेतात, जी वर्तमानपत्रे, ब्रोशर, मासिके, कॅटलॉग, कॅलेंडर इत्यादींमध्ये वापरली जातात. (Career in Modeling)
3. शोरूम मॉडेलिंग – शोरूम मॉडेल सहसा निर्यातदार, वस्त्र उत्पादक आणि मोठ्या किरकोळ विक्रेत्यांसाठी काम करताना फॅशन प्रदर्शित करतात.
मॉडेलिंगमध्ये करिअर करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे? (Career in Modeling)
तुम्हाला प्रोफेशनल मॉडेल व्हायचे असेल तर तुम्ही कोणत्याही स्ट्रीममध्ये किमान 12वी पास असले पाहिजे. तुम्ही सर्टिफिकेट, डिप्लोमा किंवा बॅचलर डिग्री कोर्स देखील करू शकता. तुम्ही मॉडेलिंग स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकता, जेथे 3 महिने ते 4 वर्षांपर्यंतचे मॉडेलिंग अभ्यासक्रम चालवले जातात.
12वी नंतर करता येणारे मॉडेलिंगचे कोर्सेस
1. क्रिएटिव्ह आर्ट्स आणि डिझाइनमध्ये BA (3 ते 4 वर्षे)
2. डिप्लोमा इन क्रिएटिव्ह आर्ट्स अँड डिझाईन (1 वर्ष)
3. फॅशन स्टाइलिंगमध्ये डिप्लोमा (1 वर्ष) व्यतिरिक्त अनेक प्रमाणपत्र अभ्यासक्रम देखील करता येतात.
कुठे करू शकता मॉडेलिंग कोर्स
1. जेडी इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन, मुंबई
2. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाईन, चंदीगड (Career in Modeling)
3. आरके फिल्म्स अँड मीडिया अकादमी, नवी दिल्ली
मॉडेलिंगसाठी शारीरिक पात्रता
1. फॅशन शोसाठी, पुरुष मॉडेल्सची उंची सहसा 5’10” (178 सेमी) असते.
2. महिला मॉडेलची उंची 5’7″ (171 सेमी) असावी. (Career in Modeling)
3. मिस्टर इंडिया सारख्या स्पर्धांमध्ये अनेकदा पुरुष मॉडेल 5’7″ (171cm) पेक्षा जास्त उंच असावे लागतात.
4. प्रिंट जाहिराती आणि व्यावसायिक मॉडेलिंगसाठी, कास्टिंग एजन्सी किमान 5’3″ (162cms) उंची असलेल्या महिलांना आणि किमान 5’7″ (171cms) उंची असलेल्या पुरुषांना प्राधान्य देतात.
सुपर मॉडेल बनण्यासाठी हे 5 गुण आवश्यक
1. लूक (Look)
मॉडेल्सना त्यांच्या व्हिज्युअल दिसण्याच्या सशक्त पैलूंबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. त्यांना स्वतःमधील हे पैलू कॅमेऱ्यासमोर आणता यायला हवेत. मॉडेलिंग करिअरसाठी तंदुरुस्त, टोन्ड बॉडी राखणे आवश्यक असते.
2. आवड
कॅमेऱ्याला सामोरे जाण्यात तुमची आवड आणि व्यावसायिक स्वारस्य असणे महत्त्वाचे आहे. मॉडेलिंग म्हणजे केवळ सुंदर दिसणे नव्हे; तर ही देखील एक कला आहे जी सतत सरावाने विकसित करावी लागते.
3. तांत्रिक ज्ञान
तुम्हाला मॉडेलिंग करताना तांत्रिक ज्ञान असणे गरजेचे नसले तरी फोटोग्राफी, सिनेमॅटोग्राफी, प्रकाशयोजना, सेट डिझाईन, वेशभूषा आणि (Career in Modeling) मेक-अप यासारखे मूलभूत ज्ञान तुम्हाला प्रशिक्षित तंत्रज्ञांसह सुरळीतपणे काम करण्यास मदत करेल. एक चांगले मॉडेल फोटोग्राफर, कॉस्च्युम डिझायनर आणि मेक-अप कलाकारांचे काम सोपे करू शकते.
4. आत्मविश्वास
कॅमेऱ्यासमोर आणि कॅमेऱ्यामागे आत्मविश्वासपूर्ण व्यक्तिमत्त्व असणं खूप गरजेचं आहे. हे तुम्हाला तुमच्या मॉडेलिंग करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत करू शकते. सर्व प्रकारचे कपडे घालण्यासाठी तुम्ही सर्वप्रथम आत्मविश्वास बाळगला पाहिजे. जेणेकरुन सादरीकरणादरम्यान (Career in Modeling) तुम्ही रंगमंचावर सहजतेने आणि सुंदरतेने जाऊ शकता.
5. निर्धार (Career in Modeling)
मॉडेलिंग हे एक क्षेत्र आहे जिथे स्पर्धा खूप जास्त आहे. त्यामुळे या क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर नियमित काम मिळणे कठीण होऊन बसते. त्यावेळी तुमचा संयम आणि सर्वांत जास्त दृढनिश्चय म्हणजेच उत्कटतेचा दृढनिश्चय उपयोगी पडेल. तुम्हाला तुमचा कामाचा अनुभव आणि चांगला पोर्टफोलिओ तयार करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. तसेच तुम्हाला आहार आणि व्यायाम याकडे काटेकोरपणे लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
देशातील टॉप फॅशन शो कोणते?
1. लॅक्मे फॅशन वीक (Career in Modeling)
2. विल्स लाइफस्टाइल इंडिया फॅशन वीक
3. इंडियन ब्राइडल फॅशन वीक
4. राजस्थान फॅशन वीक
5. व्हॅन ह्यूसेन इंडिया मेन्स वीक
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com