करिअरनामा ऑनलाईन । महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC News) वतीने घेण्यात येणारी संयुक्त पूर्व परीक्षा येत्या 30 एप्रिलला होणार आहे. परीक्षेला अगदी एक आठवडा राहिलेला असताना आता एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या परीक्षेचे प्रवेश पत्र अर्थात हॉल तिकीट टेलिग्रामवर लीक झाल्याचं आढळून आलं आहे. यामुळे MPSC देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. आता सोशल मीडियावर परीक्षार्थी तसंच नेटकरी व्यक्त होऊ लागले आहेत. दोषींवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.
विशेष बाब म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून दोन दिवसांपूर्वीच या परीक्षांचे हॉल तिकीट ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आले. मात्र हॉल तिकीट दिल्यानंतर सुद्धा एकाच लिंकवर सर्व विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट पाहायला मिळत असल्याने डेटा सेक्युरिटीचा प्रश्न समोर आला आहे.
एमपीएससीच्या परीक्षेच्या हॉल तिकीटची टेलिग्राम लिंक वायरल होत असल्याची दखल महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आली आहे. ही लिंक कशाप्रकारे जनरेट झाली? कोणी जनरेट केली? या संदर्भात एमपीएससी माहिती घेत आहे. शिवाय या लिंक संदर्भात सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची एमपीएससी सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
हा काय प्रकार आहे?
यावर 90,000 पेक्षा जास्त combine pre चे hallticket upload होत आहेत.इतका data leak कुठून झाला?का झाला?आणि तुम्हांला online mains घ्यायच्या आहेत..??https://t.co/uvKr6veQ0d@mpsc_office @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mieknathshinde @atullondhe pic.twitter.com/dzhlUy5Wjn— Baliram Doley – बळीराम डोळे (@BaliramDoley) April 23, 2023
90 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांची माहिती टेलिग्राम चॅनलवर (MPSC News) अपलोडही करण्यात आली आहे. त्यामुळे या चॅनलवरून कोणीही सहज हे हॉल तिकीट डाऊनलोड करून घेऊ शकत आहे. सोशल मीडियावर आता या गोष्टीची चर्चा सुरू झाली आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com