करिअरनामा ऑनलाईन । छत्तीसगडच्या महासमुंदची मुलगी रितिका ध्रुव हिची नासाच्या (Success Story) प्रकल्पासाठी निवड झाली आहे. सिरपूरची रहिवासी असलेली रितिका, नयापारा येथील स्वामी आत्मानंद गव्हर्नमेंट इंग्लिश स्कूलमध्ये इयत्ता 11वीत शिकते. या प्रकल्पावर काम करण्यासाठी ती श्री हरिकोटा येथील इस्रोच्या केंद्रात पोहोचली आहे. या प्रकल्पासाठी देशभरातून 6 मुलांची निवड करण्यात आली आहे. एका आदिवासी विद्यार्थिनीने पुन्हा एकदा महासमुंद जिल्ह्यासह संपूर्ण छत्तीसगडचे नाव मोठे केले आहे.
लघुग्रह शोध मोहिमेसाठी झाली निवड (Success Story)
रितिकाची ही निवड नासाच्या सिटीझन सायन्स प्रोजेक्ट अंतर्गत लघुग्रह शोध मोहिमेसाठी करण्यात आली आहे. हा प्रकल्प आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय अन्वेषण सहकार्य कार्यक्रमांतर्गत इस्रोसोबतच्या भागीदारीचा एक भाग आहे. सोसायटी फॉर स्पेस एज्युकेशन रिसर्च अँड डेव्हलपमेंट (एसएसईआरडी) ने विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यास सांगितले आहे. आंध्र प्रदेशातील सतीश धवन स्पेस सेंटरमध्ये रितिकाचे प्रशिक्षण होणार आहे. त्यानंतर पुढच्या टप्प्यात ती नोव्हेंबरमध्ये बेंगळुरू येथे इस्रो येथे होणाऱ्या लघुग्रह प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहे.
अनेक टप्प्यांनंतर झाली रितिकाची निवड
रितिकाला लहानपणापासूनच विज्ञानाची आवड आहे. तिने ८वीच्या वर्गात प्रथमच अवकाश विज्ञान स्पर्धेत भाग घेतला. तेव्हापासून ती सातत्याने विज्ञानाशी संबंधित स्पर्धांमध्ये भाग घेत आहे. नासाच्या प्रकल्पासाठी अर्ज केल्यानंतर रितिकाने सर्वप्रथम बिलासपूर येथे या विषयावरील स्पर्धेत भाग घेतला. यानंतर (Success Story) तिने आयआयटी भिलाई येथे प्रेझेंटेशन दिले. यानंतर रितिकाला इस्रोच्या श्री हरिकोटा (आंध्र प्रदेश) केंद्रात प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आले.
ब्लैक होल मधून ‘ध्वनीचा शोध’ यावर प्रेझेंटेशन दीले
या प्रकल्पात रितिकासोबत देशातील इतर सहा शालेय विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये व्होरा विघ्नेश (आंध्र प्रदेश), वेमपती श्रीयार (आंध्र प्रदेश), ओल्व्हिया जॉन (केरळ), के. प्रणीता (महाराष्ट्र) आणि श्रेयस सिंग (महाराष्ट्र). अवकाशातील निर्वात ब्लैक होल मधून आवाजाचा शोध यावर त्यांनी सादरीकरण केले. यामध्ये रितिका ध्रुवने तिच्या टीमचे नेतृत्व करत अतिशय उत्तम सादरीकरण केले. न्यायाधीशांच्या पॅनेलमध्ये डॉ. बेलवर्ड (नासा), डॉ. जोनाथन (इस्रो) आणि डॉ. ए. राजराजन (सतीश धवन स्पेस सेंटर).
वडील चालवतात सायकलचे दुकान
महासमुंद मुख्यालयापासून 18 किमी अंतरावर गुडरुडीह हे आदिवासी बहुल गाव आहे. देवसिंग ध्रुव हे रितीकाचे वडील. रितिकाचं कुटुंब तसं मध्यमवर्गीय. देवसिंग यांना दोन मुली आणि दोन (Success Story) मुलगे आहेत. देव सिंग यांच्याकडे चार एकर शेती असून ते तुमगाव येथे सायकलचे दुकान चालवतात. यातून मिळणारे उत्पन्न त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी वापरले जाते.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com