करिअरनामा ऑनलाईन। महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. या (MPSC Recruitment 2022) भरतीच्या माध्यमातून उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 228 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2022 आहे.
संस्था – महाराष्ट्र लोकसेवा आयोग
परीक्षेचे नाव – महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2022
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख – 01 ऑगस्ट 2022
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – 22 ऑगस्ट 2022
पदाचे नाव – (MPSC Recruitment 2022)
- उद्योग निरीक्षक
- दुय्यम निरीक्षक
- कर सहाय्यक
- लिपिक-टंकलेखक
पद संख्या – 228 पदे
आवश्यक शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचा.)
नोकरी करण्याचे ठिकाण – संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज फी –
अमागास – रु. 394/-
मागासवर्गीय- रु.294/-
माजी सैनिक – रु.44/-
आवश्यक शैक्षणिक पात्रता –
- उद्योग निरीक्षक, गट-क –
उद्योग निरीक्षक, गट-क संवर्ग वगळता इतर संवर्गासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किंवा महाराष्ट्र शासनाने पदवीस समतुल्य म्हणून मान्य केलेली अर्हता. उद्योग निरीक्षक, गट-क संवर्गाकरीता शैक्षणिक अर्हता खालीलप्रमाणे राहील. सांविधिक विदयापीठाची, अभियांत्रिकी मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या (MPSC Recruitment 2022) गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयांव्यतिरिक्त) किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका, किंवाविज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी. पदविका/पदवीच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेस बसलेले उमेदवार पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र असतील. मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे.
- कर सहाय्यक –
मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान ४० शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- लिपिक- टंकलेखक –
मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अहंतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
असा करा अर्ज –
- अर्ज https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर सादर करावे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना आयोगाच्या https://mpsconline.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतलेजाणार नाही.
अधिकृत वेबसाईट – mpsc.gov.in
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com