करिअरनामा ऑनलाईन । बहुतेक महिलांना असं वाटतं की, लग्नानंतर (UPSC Success Story) पुढील शिक्षण घेणं आणि विशेषतः UPSC सारख्या परीक्षेची तयारी करणं अशक्य आहे. पण रेवाडीची मुलगी उषा यादव हिने लग्नानंतरही शिक्षण पूर्ण करून महिला हवं ते साध्य करू शकतात हे सिद्ध केलं आहे. 2021 मध्ये झालेल्या UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 345 वा क्रमांक मिळवणाऱ्या उषा यादव यांनी मिळवलेलं यश महिलांसाठी प्रेरणादायक आहे. उषा यांनी UPSC परीक्षेची तयारी करण्यासोबतच नोकरीही केली. त्यांनी त्यांच्या एका महिन्याच्या मुलालाही काही काळ दूर ठेवून परीक्षेची तयारी केली.
महेर आणि सासरचा खंबीर पाठिंबा
उषा यादव यांनी सांगितलं की, परीक्षेच्या दरम्यान त्यांना त्यांच्या माहेर आणि सासरच्या दोन्ही बाजूंनी पूर्ण पाठिंबा मिळाला. उषा यांनी संपूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करावं यासाठी त्यांच्या सासर आणि माहेरच्यांनी पूर्ण काळजी घेतली. तसेच, 2019 साली या परीक्षेत निवड झालेल्या त्यांच्याच गावातील अभिषेक यादव यांच्या मार्गदर्शनाचा आपल्याला फायदा झाला असल्याचं उषा यांनी सांगितलं.
अभ्यासासाठी 1 महिन्याच्या मुलाला दूर ठेवलं (UPSC Success Story)
सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक उमेदवारांना खूप गोष्टींचा त्याग करावा लागतो. असंच काही उषा यांच्या बाबतीतही घडलं. उषा यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी त्यांनी त्यांच्या अवघ्या एका महिन्याच्या मुलालाही काही काळ दूर ठेवलं. एवढा त्याग करून UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत 345 वा क्रमांक मिळवणाऱ्या उषा यादव यांनी मिळवलेलं यश महिलांसाठी प्रेरणादायक आहे.
पाचवेळा अपयश आलं… तरी जिद्द सोडली नाही
उषा यादव UPSC परीक्षेत 4 वेळा अपयशी ठरल्या. पाचव्यांदा मुलाखतीतून बाहेर पडल्या. मात्र, असं होऊनही त्यांनी हार मानली नाही आणि अथक प्रयत्नांनंतर अखेर ध्येय गाठलंच. उषा यादव म्हणाल्या की, “4 वेळा लेखी परीक्षेत अपयश आले. पाचव्यांदा लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाले. मात्र मुलाखतीत नापास झाले. एवढं होऊनही मी जिद्द सोडली नाही. अपयशातून मी शिकत होते आणि चुका दुरुस्त करत होते. सासर आणि माहेरच्या लोकांकडूनही पूर्ण सहकार्य होतं. त्यामुळे सहाव्या प्रयत्नात मला मी निश्चित केलेल्या ध्येयापर्यंत पोहचता आलं.”
पती – पत्नी दोघे आहेत B.Tech
उषा यादव महेंद्रगड जिल्ह्यातील भाखरी गावची मुलगी आहे. 2016 मध्ये त्यांचं लग्न रेवाडी येथील सेक्टर 3 येथील रवी यादव यांच्याशी झालं होतं. त्यांना साडेतीन वर्षांचा मुलगा आहे. (UPSC Success Story) पती-पत्नी दोघांनी NIT मुर्थलमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये B.Tech केलं आणि त्यानंतर दोघांनाही नोकरी मिळाली.
नोकरी सांभाळत केला अभ्यास
सध्या उषा यादव या सहाय्यक विभाग अधिकारी म्हणून दिल्लीत कार्यरत आहेत. आपला अनुभव सांगताना उषा यांनी सांगितलं की, नोकरी करत असतानाच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी केली. परीक्षा जवळ आल्यावर काही काळ रजा घेऊन अभ्यास केला. नागरी सेवा परीक्षेत उत्तीर्ण होऊन देशासाठी आणि समाजासाठी काहीतरी करण्याचं त्यांचं स्वप्न होतं आणि आता ते स्वप्न पूर्ण झालं आहे.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com