करिअरनामा ऑनलाईन । ज्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशीप हवी आहे आणि ज्यांना समाजसेवेची आवड आहे त्यांच्यासाठी SBI घेऊन SBI Youth for India Fellowship 2022 घेऊन आलेली आहे. २१ ते ३२ या वयोगटातील होतकरू तरुण तरुणतरुणीसाठी हि स्कॉलरशिप सुवर्णसंधी ठरणार आहे. यामध्ये रु. ५० हजारापेक्षा जास्त स्कॉलरशिप मिळणार आहे. त्यासोबत तुम्हाला राहणं, खाणं, फिरणं यासारख्या अनेक सोयी मोफत मिळणार आहेत.
याबरोबरच SBI सोबत काम करणाऱ्या अनेक NGO यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे तुम्हाला या NGO सोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. या फेलोशिपमधून ग्रामीण भागातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी थेट ग्रामीण भागातील लोकांमध्ये मिसळून काम करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. जर तुम्हाला हि फेलोशिप मिळवायची असेल तर त्यासाठी पुढील पात्रता आवश्यक आहे.
आवश्यक पात्रता :
उमेदवार भारतीय किंवा NRI नागरिक असावा
वय वर्षे २१ ते ३२ दरम्यान असावे
पदवी शिक्षण पूर्ण केलेले असावे
मिळणारे फायदे SBI Youth for India Fellowship 2022 :
५० हजार रुपयांपर्यंत स्कॉलरशिप मिळणार
राहणं, जेवण आणि फिरणं मोफत होणार
असा मिळणार भत्ता:
राहण्यासाठी रु. 15 हजार चा मासिक भत्ता
वाहतुकीसाठी रु. 1 हजार चा मासिक भत्ता
फेलोशिप यशस्वीरीत्या पूर्ण केल्यावर रु. 50 हजारचा भत्ता
अर्ज करण्याची पद्धत : Online (www.careernama.com)
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 एप्रिल 2022
अशी असेल निवड प्रक्रिया:
१. अर्जाची पडताळणी
२. अस्सीसमेंट टेस्ट
3. मुलाखत
SBI Youth for India Fellowship 2022 साठी अर्ज प्रक्रिया –
खालील ‘Apply Now‘ बटणावर क्लिक करा.
‘प्राथमिक अर्ज’ सह पुढे जाण्यासाठी वैध ईमेल आयडी प्रविष्ट करा. त्यानंतर एक एक गोष्ट भरून अर्ज सबमिट करा.
‘प्राथमिक अर्ज’ पूर्ण केल्यानंतर, नोंदणीकृत ईमेलवर ‘ऑनलाइन मूल्यांकन स्टेज’ सोबत एक लिंक पाठवली जाईल.
सर्व आवश्यक तपशीलांसह अर्ज भरा, निबंधातील प्रश्नांची उत्तरे द्या आणि संबंधित कागदपत्रे अपलोड करा.
अर्ज सबमिट करा.
Click here for SBI Youth for India Fellowship 2022 online application.
फेलोशिपसाठी अटी आणि नियम:
१. 13 महिन्यांचा कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर SBI नोकरीची ऑफर देत नाही.
२. फेलोना संपूर्ण कालावधीत प्रकल्प सुरु आहे त्याठिकाणी राहण्याची आवश्यकता आहे.
३. अर्धवेळ सहभागाला वाव नाही.
४. एका प्रकल्पाच्या ठिकाणी किमान दोन फेलो पोस्ट केले जातील.
हे पण वाचा –
IISER प्रवेशास सुरुवात; असा करा अर्ज
US मधील विद्यापिठांतून घरबसल्या शिक्षण घ्या; अशी आहे अर्ज प्रक्रिया