IIM After 12th : काय सांगता? 12 वी नंतर थेट IIM ला प्रवेश, CAT परीक्षाही द्यायची गरज नाही; असा करा अर्ज

करिअरनामा ऑनलाईन । अनेकांचं मोठ्या कॉलेज मधून किंवा मोठ्या विद्यापीठातून उच्च शिक्षण घेण्याचं स्वप्न असत. १२ वी नंतर आता पुढे काय करायचं असा प्रश्नही अनेकांना पडलेलो असतो. MBA करण्याचेच डोक्यात असेल तर कोणी BBA ला प्रवेश घेऊन त्यानंतर MBA अभ्यासक्रमासाठी प्रवेश शेतात. BBA चे शिक्षण घेतलेल्या प्रत्येकाचं IIM मधून PG करण्याची इच्छा असते. IIM ला प्रवेश घ्यायचा म्हटलं तर CAT (Common Admission Test) क्रॅक करावी लागते. मात्र आज आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला CAT परीक्षा न देताही IIM ला प्रवेश घेता येऊ शकतो. इतकंच नाही तर थेट १२ वी नंतर IIM ला (IIM After 12th) प्रवेश कसा घ्यायचा याबाबत माहिती देणार आहोत.

IIM Ahmedabad

लेखी चाचणी (WAT) उत्तीर्ण करतात, त्यांना प्रतिष्ठित महाविद्यालयांमध्ये जागा मिळवण्यासाठी गट चर्चा (GD) आणि वैयक्तिक मुलाखत (PI) देऊन चांगले गुण घ्यावे लागतात. मात्र अनेकांना याच्याव्यतिरीतही IIM ला प्रवेश घेण्याचे मार्ग आहेत याची माहिती नसते. चला तर जाणून घेऊयात अशा काही प्रवेश प्रक्रियांबाबत थोडक्यात

JIPMAT : आता आय. आय. एम. (IIM) ला प्रवेश घेण्यासाठी विद्याथ्याला पदवीचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत वाट पाहण्याची गरज नाही. कारण Integrated Programm in Management (IPM) हा एक स्पेशल कोर्स IIM तर्फे सुरु करण्यात आला आहे. याद्वारे बारावीनंतरच विद्यार्थ्यांना IIM ला प्रवेश मिळणार आहे. जे विद्यार्थी बारावी नंतर IIM च्या या कोर्सला प्रवेश घेतील त्यांना पाच वर्ष अभ्यास करावा लागणार आहे. यांनतर त्यांना दोन डिग्री मिळणार आहेत. एक BBA अन दुसरी MBA. याकरता इच्छुक विद्यार्थ्यंयांना Joint Integrated Programm in Management Admission Test (JIPMAT) हि परीक्षा द्यावी लागणार आहे. (IIM After 12th)

हे पण वाचा -
1 of 14

iim lucknow

कोणकोणत्या IIM मिळू शकतो प्रवेश ? (IIM After 12th)

सध्या IIM जम्मू, IIM बोधगया, IIM रोहतक, IIM इंदूरसह यांच्यासह अनेक IIM मध्ये हा कोर्स सूरु आहे. या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी, विद्यार्थ्यांना नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित जॉइंट इंटिग्रेटेड प्रोग्राम इन मॅनेजमेंट टेस्ट (JIPMAT) क्रॅक करणे आवश्यक आहे. याआधी, फक्त IIM इंदूर आणि IIM रोहतक हे JIPMAT द्वारे एकात्मिक अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देत होते. मात्र 2021 पासून IIM रांची, IIM जम्मू आणि IIM बोधगया यांनी ही प्रक्रिया सुरू केली. (IIM After 12th)

इथे करा अर्ज –  http://www.jipmat.ac.in/home.php

टीप : अद्याप अर्जप्रक्रिया सुरु झालेली नसून तुम्ही जर येथे प्रवेश घेण्यास इच्छुक असाल तर www.careernama.com ला भेट देऊन रोजचे नवीन अपडेट तपासा. तसेच वरील ऑफिसिअल वेबसाईटवर भेट देऊन अर्ज प्रक्रिया सुरु झाले का ते वरचेवर पहा.