11th Admission : 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; ‘या’ तारखेपासून सुरु होणार नोंदणी 

करिअरनामा ऑनलाईन । इयत्ता 10वी CBSE बोर्डाचा निकाल (11th Admission) जाहीर झाल्यानंतर आता इयत्ता 11 वी च्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ऑनलाईन अकरावी प्रवेश प्रक्रियेला 25 मे पासून सुरूवात होणार आहे. 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होण्याआधी विद्यार्थी प्रवेश प्रक्रिया अर्जाचा भाग 1 भरणार आहेत. तर 10वी बोर्ड परीक्षेच्या निकालानंतर कॉलेज पसंती क्रमांक देऊन अर्जाचा भाग दोन भरण्यास वेळ दिला जाणार आहे.
राज्याच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयातर्फे (11th Admission) राबविल्या जाणाऱ्या इयत्ता 11वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे. विद्यार्थ्यांना येत्या 25 मे पासून इयत्ता दहावीच्या निकालापर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्जाचा पहिला भाग भरण्यास उपलब्ध करुन दिला जाणार आहे. विद्यार्थी येत्या 20 ते 24 मे या कालावधीत प्रवेश अर्ज भरण्याचा सराव करु शकतात; असे राज्य माध्यमिक शिक्षण संचालक कार्यालयातर्फे कळवण्यात आले आहे.

राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे 2017-18 पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे व पिंपरी चिंचवड महानगरपालिका, नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका (11th Admission) क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने केले जातात. 2023-24 या वर्षातील प्रवेश सुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच केले जाणार आहेत. त्यामुळे अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

असे आहे प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक (11th Admission)
1. 20 मे ते 24 मे दरम्यान विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक भरण्यासाठीचा सराव करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे.
2. 25 मे सकाळी 11 वाजल्यापासून ते 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर होईपर्यंत विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेश अर्जाचा भाग एक ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे .
3. यामध्ये विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावर जाऊन अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेसाठी रजिस्ट्रेशन करून अर्जाचा भाग एक भरुन व्हेरिफाय करायचे आहे.
4. 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेश अर्जाचा भाग दोन विद्यार्थ्यांना भरता येईल
ज्यामध्ये विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर (11th Admission) जाऊन ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचे पसंती क्रमांक देऊन इतर माहिती भरावी लागणार आहे.
5. 10वी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर 10 ते 15 दिवसात पहिली प्रवेश फेरी पूर्ण करून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
6. त्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेची दुसरी आणि तिसरी त्यासोबतच विशेष फेरीचे नियोजन शिक्षण विभागाकडून करण्यात येईल.
नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob
Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com