Waqf Board : महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डात कर्मचारी भरतीचा मार्ग मोकळा, लवकरच सुरु होणार भरती प्रक्रिया

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । गेल्या अनेक महिन्यांपासून महाराष्ट्र राज्य वक्फ (Waqf Board) बोर्डात 169 कर्मचारी भरतीचा प्रश्न प्रलंबीत होता. अखेर या प्रस्तावाला सरकारकडून मंजुरी मिळाली असून, बोर्डाच्या बैठकीत ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांनी दिली.

नागपूर येथे वक्फ बोर्डाची बैठक पार पडली. या बैठकीत वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वजाहत मिर्झा यांच्यासह खासदार फौजिया खान, हसनैन शाकेर, डॉ.मुदस्सीर लांबे, मौलाना हाफिज अथर अली, समीर गुलाम नबी काजी तसेच बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जुनेद सय्यद यांची उपस्थिती होती.

वक्फ बोर्डात भरती प्रक्रिया राबविण्याबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाला शासनाकडून मंजूरी मिळाली होती. यामुळे भरती प्रक्रिया राबविण्याबाबत (Waqf Board) वक्फ बोर्डाच्या बैठकीत प्रस्ताव ठेवण्यात आला होता.

या बैठकीत सर्व सदस्यांच्या अनुमतीने भरती प्रक्रिया राबवून लवकरात लवकर भरती करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीत प्रलंबीत मुतवल्लींचे 65 प्रकरणेही निकाली काढण्यात आले आहे.

तक्रार निवारण होणार तातडीने (Waqf Board)

वक्फ बोर्डाचे काम गतिशील प्रभावी व लोकाभिमुख व्हावे यासाठी राज्यात प्रत्येक जिल्ह्यात बोर्डाचे शिबिर घेण्यात येणार आहे. या शिबीरांमध्ये वक्फ संबंधित तक्रारींचा ऑन द स्पॉट (Waqf Board) निवारण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या शिबीरात बोर्डाचे जबाबदार सदस्य व अधिकारी उपस्थित राहतील व लोकांच्या तक्रारी व त्यांच्या समस्यांना ऐकून घेतील. या शिबिरांच्या तारखांची लवकरच घोषणा केली जाणार आहे.

नोकरी अपडेट्स आणि करिअरविषयक मोफत मार्गदर्शनासाठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921959285 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा HelloJob

Click Here To Join Our Whatsapp Group
Click Here To Join Our Telegram Channel

अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com