UPSC Success Story : UPSCसाठी सोडली मेडिकलची प्रॅक्टिस; 5 वी रॅंक मिळाली पण IAS पद नको…टॉपरने सांगितली इच्छा

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । आसाममधील सोनितपूर जिल्ह्यातील (UPSC Success Story) तेजपूर येथील रहिवासी मयूर हजारिका व्यवसायाने डॉक्टर आहे. UPSC परीक्षा पास होईपर्यंत मयूरने राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत आसाममध्ये वैद्यकीय अधिकारी म्हणून काम केले आहे. लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्याकडून प्रेरणा मिळाल्याचे त्याने सांगितले आहे. व्यवसायाने डॉक्टर असणाऱ्या मयूरने लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत संपूर्ण भारतात 5 वी रॅंक मिळवून नांव उंचावलं आहे.

UPSC Success story of Mayur Hajarika

UPSCसाठी सोडली मेडिकलची प्रॅक्टिस (UPSC Success Story)
UPSC मध्ये देशात 5 वा क्रमांक मिळवणारा मयूर हजारिका शाळेत असल्यापासूनच अभ्यासात हुशार आहे. आसामच्या माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 10वीच्या बोर्ड परीक्षेत त्याने 10वी रँक मिळवली होती; तर 12 वी च्या परीक्षेत त्याने 9वा क्रमांक मिळवला होता. मयूरकडे एमबीबीएसची पदवी आहे. एमबीबीएस पूर्ण केल्यानंतर त्याने UPSC ची तयारी सुरु केली. पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने मेडिकलचा व्यवसाय सोडला आणि संपूर्ण लक्ष अभ्यासाकडे केंद्रित केले.

UPSC Success story of Mayur Hajarika

ऑनलाईन कोचिंगच्या माध्यमातून केला अभ्यास
मयूरचे वडील कृष्णा हजारिका हे आसामच्या सार्वजनिक बांधकाम विभागात (पीडब्ल्यूडी) सहाय्यक कार्यकारी अभियंता आहेत. तर त्याची आई मौसमी हजारिका (UPSC Success Story) गृहिणी आहेत. मयूरने 12वीत असताना UPSC परीक्षा देण्याचं ठरवलं होतं.  अभ्यासाच्या तयारीबद्दल बोलताना मयूरने सांगितले; “मी नागरी सेवा परीक्षेसाठी ऑनलाइन कोचिंग घेतले.”

 

UPSC Success story of Mayur Hajarika

IFS सेवेत सामील व्हायचंय (UPSC Success Story)
UPSC परीक्षेत अव्वल ठरलेल्या सर्वाधिक टॉपर्सनी IASला पहिली पसंती दिली आहे. पण दुसरीकडे मयूरचे स्वप्न वेगळे काही करण्याचे आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्याने सांगितले; की “मला या परिक्षेत एवढी चांगली रँक मिळेल अशी अपेक्षा नव्हती. मी माझ्या निकालावर पूर्ण समाधानी आहे. माझे पहिले प्राधान्य भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (IAS) नाही, मला भारतीय विदेश सेवेत (IFS) सामील व्हायचे आहे.”
मयूर हा फुटबॉल प्रेमी आहे. त्याला फावल्या वेळेत (UPSC Success Story) रुबिक्स क्यूब सोडवायला आवडते. अभ्यासातून रिकामा वेळ मिळाल्यानंतर  रुबिक्स क्यूब सोडवणे त्याला मजेदार आणि आव्हानात्मक वाटते.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com