UPSC Success Story : अपघातात हात-पाय गमावले; तीन बोटांनी पेपर सोडवला; पहिल्याच प्रयत्नात क्रॅक केली UPSC

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । परिस्थिती कशीही असो, माणसाची (UPSC Success Story) इच्छाशक्ती प्रबळ असेल तर प्रत्येक परिस्थिती त्याच्यासमोर लहानच असते. मैनपुरीच्या सूरज तिवारीनेही अशीच कामगिरी करुन दाखवली आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या UPSC 2022 परीक्षेच्या अंतिम निकालात त्याने संपूर्ण भारतात 917 वा क्रमांक मिळवला आहे. सूरजला दोन्ही पाय नाहीत, एक हातही नाही आणि एका हाताला तीनच बोटे आहेत. तरीपण त्याने आपले शारीरिक अपंगत्व आपल्या ध्येयाच्या आड येवू दिले नाही.
गावकऱ्यांनी मिठाई वाटली
सूरज तिवारी हा राजेश तिवारी यांचा मुलगा आहे. तो मैनपुरी जिल्ह्यातील कुरवली तहसीलमधील मोहल्ला घरनाजपूर येथील रहिवासी आहे. त्याचे सुरुवातीचे शिक्षण शहरातील (UPSC Success Story) महर्षी परशुराम शाळेत झाले. त्याने SBRL इंटर कॉलेज मैनपुरी मधून 10वी आणि 2014 मध्ये संपूर्णानंद इंटर कॉलेज आराम सराय बेवर मधून 12वी पास केली. सूरजच्या निकालाची माहिती मिळताच त्याच्या कुटुंबीय आणि नातेवाईकांच्या आनंदाला पारावार उरला नाही. गावातील लोकांनी तर मिठाई वाटून आनंद साजरा केला .

रेल्वे अपघाताने मिळाली आयुष्याला कलाटणी
24 जानेवारी 2017 रोजी गाझियाबाद येथे झालेल्या रेल्वे अपघातात सुरजला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याचे  दोन्ही पाय, उजव्या हाताचे कोपर आणि डाव्या हाताची दोन बोटे कापण्यात (UPSC Success Story) आली होती. यानंतरही सूरजने हार मानली नाही. त्याने न खचता 2021 मध्ये जेएनयू, दिल्लीतून बीए केले. यानंतर एम.ए. करुन आयएएसची तयारी सुरू केली.
वडील आहेत टेलर मास्टर
सुरज मध्यमवर्गीय कुटुंबातील असून त्याचे वडील राजेश तिवारी टेलर मास्टर आहेत. त्यांचे कुरावली येथे छोटे टेलरिंगचे दुकान आहे. यावर त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ चालतो. सुरजला (UPSC Success Story) अपघातात हात आणि पाय गमवावे लागले. या धक्क्यातून त्यांचे सावरत होते तो पर्यंत काही वर्षांनी त्याचा भावाचा मृत्यू झाला. कुटुंबांची आर्थिकस्थिती खालावली, तरीही सुरजने एकाग्रता भंग न होवू देता आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रीत केले.

तीन बोटांनी सोडवला पेपर (UPSC Success Story)
सुरजने सर्वांसमोर एक आदर्श घालून दिला आहे; की परिस्थिती कितीही बिकट असली तरी हार मानू नये. त्याने रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय आणि एक हात गमावला आहे. केवळ एका हाताच्या तीन बोटांनी त्यांनी पेपर सोडवत हे यश मिळवले आहे. त्याने यासाठी दिवसाचा 18 ते 20 तास अभ्यास केला आहे. UPSC चा अभ्यास करताना त्याने कोणतेही कोचिंग क्लास किंवा एक्स्ट्रा क्लास न लावता सेल्फ स्टडीवर भर देवून परीक्षा पास केली आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com