UPSC Success Story : भाड्याच्या खोलीत राहून केला सेल्फ स्टडी; शेतकरी पुत्र बनला क्लास वन अधिकारी
करिअरनामा ऑनलाईन । आयुष्यात संघर्ष चुकला नाही (UPSC Success Story) असा शोधून सापडणार नाही. असंख्य संकटांवर मात करत पुन्हा उभे राहण्याची जिद्द ज्यांच्याकडे असते तीच मुले आयुष्यात काहीतरी करुन दाखवतात. हीच धडपड शेतकऱ्यांच्या मुलांमध्येही दिसते. अशाच एका शेतकऱ्याच्या मुलाची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. अनेक अडचणींवर मात करत शेतकऱ्याच्या मुलाने UPSC परीक्षा पास केली आहे.
सुनील कुमार मीना असं या तरुणाचं नांव आहे. UPSC परीक्षेत त्याने संपूर्ण भारतातून 187 वा क्रमांक मिळवून स्वतःचं आणि कुटुंबाचं नाव उंचावलं आहे. सुनील कुमार मीना हा एका सामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. त्याच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतंय.
सेल्फ स्टडी करुनही यश मिळवता येतं (UPSC Success Story)
कोणत्याही आधुनिक सोयी सुविधा हाती नाहीत, खिशाला कोचिंग क्लासची फी परवडत नाही; अशा परिस्थितीत केवळ सेल्फ स्टडी करुन देखील UPSC परीक्षा पास करता येते हे सुनील याने दाखवून दिले आहे. यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी त्याने कोणत्याही कोचिंग क्लासचा आधार घेतला नाही. स्वतःमधील जिद्द, कठोर परिश्रम आणि संघर्षाच्या जोरावर सुनीलने हे यश मिळवले आहे.
दोन भावंडे सरकारी सेवेत तर तिघे करतायत स्पर्धा परीक्षेची तयारी
सुनील कुमार मीना हे राजस्थानमधील धौलपूर जिल्ह्यातील राहराई गावचे रहिवासी आहेत. त्यांच्या वडिलांचे नाव भौर्य मीना आणि आईचे नाव हरप्यारी आहे. त्यांना 6 भावंडे आहेत. सुनील यांचा मोठा भाऊ रामवीर मीणा हे वाहतूक निरीक्षक म्हणून तर राजवीर रेल्वेत लोको पायलट म्हणून तैनात आहेत. त्यांचा एक भाऊ, सत्यप्रकाश आणि दोन बहिणी, रेवती आणि रेशम स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.
भाड्याच्या खोलीत राहून केला अभ्यास (UPSC Success Story)
कुटुंबाची आर्थिक परिस्थिति बेटाची असली तरी आई-वडिलांनी मुलांचे शिक्षण थांबू दिले नाही. सुनील कुमार यांनी जवाहर नवोदय विद्यालयातून इयत्ता 5वी ते 12वी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर ते दिल्लीला गेले आणि त्यांनी किरोरी माल महाविद्यालयातून B.A. ची पदवी घेतली. यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या भूगोल विद्याशाखेतून M.A. केले आहे. शिक्षणासाठी घरापासून लांब राहत असताना त्यांनी भाड्याची खोली घेतली. या खोलीतच त्यांनी कॉलेजच्या अभ्यासासोबत UPSCची तयारीही सुरू केली. त्यांनी अभ्यासासाठी सेल्फ स्टडीवर भर दिला तसेच अवांतर वाचनासाठी ग्रंथालयाचा आधार घेतला. प्रतिकूल परिस्थितीत सुनील कुमार मीना यांनी मिळवलेले यश हे असामान्य म्हणावे लागेल.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com