UPSC Success Story : घोटाळा उघडकीस आणला अन गुंडांच्या 7 गोळ्या झेलल्या, दृष्टी गेली…बहिरेपणा आला; तरीही क्रॅक केली UPSC

करिअर विषयक अपडेट्ससाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now

करिअरनामा ऑनलाईन । असं म्हणतात की; “सर्वात अद्भुत आणि (UPSC Success Story) बुद्धिमान व्यक्ती तो आहे ज्याचे हेतू उदात्त आणि प्रामाणिक आहेत.” ही म्हण खरी करून दाखवली आहे UPSC नागरी सेवा परीक्षा पास केलेल्या रिंकू सिंह राहीने. रिंकूच्या संघर्षाची कहाणी बॉलिवूडच्या ब्लॉक बस्टर चित्रपटापेक्षा कमी नाही. रिंकू राही (IAS Rinku Rahi) ही तीच व्यक्ती आहे जिने तब्बल 83 कोटी रुपयांचा शिष्यवृत्ती घोटाळा उघडकीस आणला होता; ज्यामुळे त्यांच्यावर माफियांनी गोळीबार केला होता. या जीवघेण्या हल्ल्यानंतरही, रिंकूने जगणे सोडून दिले नाही. कठोर मेहनतीमुळे 2021 मध्ये त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा पास केली आहे.

7 गोळ्या झेलल्या; दृष्टी गेली, श्रवणशक्तीही गमावली (UPSC Success Story)
रिंकू राही प्रथम 2008 मध्ये पीसीएस अधिकारी बनले; ज्या अंतर्गत त्यांची उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये समाज कल्याण अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. यावेळी रिंकूच्या लक्षात आले की राज्यात सुरू असलेला शिष्यवृत्ती घोटाळा त्यांनी वेळीच उघड केला. त्यावेळी राज्यातील बलाढय़ांच्या विरोधात जाऊन त्यांनी हा घोटाळा उघडकीस आणल्याने त्याचा फटका त्यांना सहन करावा लागला. त्यांना माफियांनी 7 वेळा गोळ्या घातल्या. सात गोळ्या लागल्यानंतरही रिंकू यांनी हार मानली नाही आणि ते पुन्हा लढाईच्या मैदानात उतरले. त्यांनी समाजातील दुष्कृत्यांविरुद्ध लढा दिला. रिंकू यांना गोळ्या लागल्या त्या सात गोळ्यांपैकी तीन गोळ्या त्यांच्या चेहऱ्याला लागल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या एका डोळ्याची दृष्टी गेली आणि एका कानाची श्रवणशक्तीही त्यांना गमवावी लागली होती.

स्कॉलरशिप घेवून पदवी पूर्ण केली
रिंकू यांच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना (UPSC Success Story) सरकारी शाळेतून शिक्षण घ्यावे लागले. रिंकू यांनी त्यांचे प्राथमिक शिक्षण काउंसिल स्कूलमधून पूर्ण केले आणि 12वी पर्यंतचे शिक्षण गव्हर्नमेंट इंटर कॉलेजमधून पूर्ण केले. रिंकू यांना 12 वी मध्ये खूप चांगले गुण मिळाले होते, त्यामुळे त्यांना शिष्यवृत्तीची ऑफर देण्यात आली होती. शिष्यवृत्तीच्या मदतीने त्यांनी टाटा इन्स्टिट्यूटमधून बी.टेकचे (B.Tech) शिक्षण पूर्ण केले.

UPSC मध्ये मिळवला 683 वा क्रमांक (UPSC Success Story)
रिंकू 2019 मध्ये हापूर येथील सरकारी IAS PCS फ्री कोचिंग सेंटरचे संचालक म्हणून काम करत होते. इथे काम करत असताना त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षेची तयारी केली आणि 2021 या वर्षी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी यावेळी संपूर्ण भारतातून 683 वा क्रमांक मिळवला होता.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com