करिअरनामा ऑनलाईन । बिहारच्या राहुल श्रीवास्तवने UPSC परीक्षेत (UPSC Success Story) संपूर्ण भारतातून 10 वा क्रमांक मिळवून इतिहास रचला आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या टॉप 10 यादीत राहुलचे नाव आल्यानंतर पटनाच्या चिटकोहरामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. राहुल इथला रहिवासी आहे. त्याची ही बातमी ऐकल्यानंतर त्याच्या शेजारच्या लोकांनी तर त्याला अक्षरशः डोक्यावर घेतलं. पूर्व परिक्षेत 3 वेळा अपयश आल्यानंतर चौथ्या वेळेस त्याला यश मिळवता आलं आहे.
अभ्यास करताना क्रिकेट सोडलं नाही (UPSC Success Story)
राहुलच्या घरचे आणि शेजारचे त्याला ‘हनी’ या टोपण नावाने हाक मारतात. राहुलच्या शेजाऱ्यांनी सांगितले, “हनी सुरुवातीपासून अभ्यासात चांगला होता. त्याच्याबद्दल ऐकून खूप आनंद झाला. त्याचा स्वभाव खूप शांत आहे आणि अभ्यासाचे वेड असूनही तो क्रिकेट खेळण्यासाठी वेळ काढत असे.”
बिहारची माती लढायला शिकवते
राहुलच्या म्हणण्यानुसार, “बिहारची माती लढायला शिकवते. कठोर परिश्रम घेण्याची प्रेरणा इथूनच मिळते. तुमचे ध्येय स्पष्ट असेल, तर तुम्ही ते साध्य करू शकता. ध्येयाप्रती समर्पण सर्वात महत्वाचे आहे. आणि यासाठी सुरुवातीपासूनच कठोर परिश्रम करावे लागतील.”
कुटुंबाच्या सहकार्याने ध्येय गाठणं सोप्पं आहे
राहुलच्या यशात त्याच्या कुटुंबाने त्याला मोठा पाठिंबा दिला. घरात अभ्यासाचे वातावरण असल्याने त्याला मोठे पाठबळ मिळत होते. पालकांच्या सहकार्यामुळे त्याला निश्चित (UPSC Success Story) ध्येय गाठता आल्याचं तो म्हणतो. राहुलने 2009 मध्ये पटना येथील सेंट केरेन्स स्कूलमधून 10वीची परीक्षा दिली आणि त्यानंतर 2011 मध्ये डीएव्ही बोर्ड कॉलनीतून 12वीची परीक्षा दिली. यानंतर त्याने एनआयटी त्रिची येथून इन्स्ट्रुमेंटेशनचे शिक्षण घेतले.
शेजाऱ्यांना वाटतो अभिमान
त्याच्या एका शेजाऱ्याने सांगितले की, राहुलला क्रिकेटमध्ये खूप रस आहे. तो एक डावखुरा गोलंदाज आहे आणि तो खूप चांगले क्रिकेट खेळतो. पाटणा येथील राहुलच्या (UPSC Success Story) घराजवळ राहणारे लोक सांगतात की त्यांना राहुलने मिळवलेल्या यशामुळे खूप अभिमान वाटत आहे. राहुल हा खूप चांगला आणि सभ्य मुलगा आहे आणि तो आत्मविश्वासाने भरलेला व्यक्ती आहे.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com