करिअरनामा ऑनलाईन । नवनीत आनंद यांची कथा वाचून तुमचे (UPSC Success Story) डोळे पाणावतील. नवनीत आनंद (Navneet Anand IPS) यांना अगदी लहान वयात कठीण आव्हानांचा सामना करावा लागला आहे. ही आव्हाने पेलत त्यांनी देशातील सर्वात कठीण परीक्षा पास केली आहे. देशात सर्वात अवघड समजली जाणारी UPSC परीक्षा त्यांनी पास केली आहे. वडिलांच्या पश्चात कौटुंबिक जबाबदारी पार पाडत केवळ सेल्फ स्टडीच्या जोरावर करिअरमध्ये मोठी झेप घेणाऱ्या नवनीत यांच्या संघर्षाविषयी जाणून घेवूया…
लहान वयातच वडिलांचं छत्र हरपलं
नवनीत आनंद हे मूळचे बिहारचे आहेत. पण त्यांचे शिक्षण राजस्थान आणि दिल्लीत येथे झाले आहे. इयत्ता 7 वीत शिकत असताना लहान वयातच त्यांनी वडिलांना गमावलं. यानंतर कुटुंबाची (UPSC Success Story) जबाबदारी त्यांच्यावर आली. कौटुंबिक जबाबदारी पर पडत असताना त्यांनी कधीही अभ्यासात तडजोड केली नाही; याचा परिणाम आज सर्वांसमोर आहे. नवनीत यांना आयपीएस कॅडर मिळाले आहे.
वेळ न घालवता केली तयारी
नवनीत यांनी राजस्थानच्या चित्तौडगड येथील सैनिक स्कूलमधून (UPSC Success Story) शिक्षण घेतले आहे. शाळेच्या शिस्तीने त्यांच्या जीवनाला नवी कलाटणी मिळाली आहे. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर नवनीत यांनी दिल्लीच्या आंबेडकर विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली. यानंतर त्यांनी दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून समाजशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेतले. नवनीत यांना खेळाची विशेष आवड आहे. खेळाची आवड जोपासत पदवीचे शिक्षण घेत असताना त्यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. कॉलेजमधून उत्तीर्ण होताच त्यांची सरकारी नोकरीसाठी निवड झाली.
ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि यश मिळाले (UPSC Success Story)
नवनीत आनंद यांनी सेल्फ स्टडीच्या जोरावर UPSC नागरी सेवा परीक्षेत यश मिळविले आहे. परीक्षेची तयारी करताना त्याच्यासमोर आलेले सर्वात मोठे आव्हान म्हणजे संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करताना मानसिकदृष्ट्या खंबीर राहणे; हे होते. पहिल्या दोन प्रयत्नांत नवनीत अपयशी ठरले होते. घरापासून दूर राहिल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले, परंतु त्यांनी केवळ आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केले आणि शेवटी ते यशस्वी झाले.
अनेक सरकारी परीक्षेत मिळवले यश
2023 मध्ये नवनीत यांचा UPSC परीक्षेचा तिसरा (UPSC Success Story) प्रयत्न होता ज्यामध्ये त्यांनी संपूर्ण भारतातून 499 वा क्रमांक मिळवला आहे. त्यांना आयपीएस (IPS) कॅडर देण्यात आले आहे. सध्या नवनीत सीआयएसएफमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून प्रशिक्षण घेत आहेत. प्रशिक्षणासोबतच त्यांनी यूपीएससीच्या मुलाखतीची तयारीही केली. याआधी नवनीत यांनी UPSC CAPF, CDS आणि UGC NET सारख्या कठीण परीक्षा देखील पास केल्या आहेत.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com