करिअरनामा ऑनलाईन । स्पर्धा परीक्षा पास होवून अधिकारी (UPSC Success Story) होणाऱ्या अनेक तरुणांची कहाणी आपण वाचली आहे. आज आम्ही तुम्हाला हिमाचल प्रदेशातील एका मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने पहिल्याच प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास केली आहे. मुस्कान जिंदाल असं या तरुणीचं नाव आहे. मुस्कानने पदवीचं शिक्षण घेत असताना UPSC परीक्षेची तयारी केली. UPSC देताना परीक्षेच्या पहिल्याच प्रयत्नात तीने परीक्षा पास केल्यामुळे देशातील युवा वर्गासाठी ती आदर्श ठरली आहे.
हिमाचल प्रदेशची मुलगी
हिमाचल प्रदेशातील सोलन जिल्ह्यातील मुस्कान रहिवासी आहे. तिचं संपूर्ण शिक्षण इथंच झालं. शालेय वयापासून ती अभ्यासात एकदम हुशार होती त्यामुळे तिला बारावीच्या परीक्षेत ९६.४ टक्के गुण मिळाले होते. एवढेच नाही तर शाळेत तिने पहिला क्रमांकही पटकावला होता.
ग्रॅज्युएशन सुरु असताना केली UPSC ची तयारी
आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे हे मुस्कानने निश्चित ठरवलं होतं. त्यामुळे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने पदवीचे शिक्षण घेत असताना नागरी सेवा परीक्षेची तयारी सुरू केली. पदवीच्या अंतीम वर्षात तिने UG अभ्यास तसेच UPSC परीक्षांसाठी वेळ काढला.
AIR 87 मिळवली (UPSC Success Story)
मुस्कानचा UPSC परीक्षेचा अभ्यास सुरु होता. पण जेव्हा परीक्षेची तारीख जवळ आली तेव्हा नियमानुसार वय मर्यादा पूर्ण होत नसल्याने मुस्कानला परीक्षेला बसण्यासाठी वर्षभर वाट पाहावी लागली. या वेळेचा तिने फायदा घेतला आणि या काळात ती मनापासून परीक्षेची तयारी करत राहिली. पुढील वर्षी तिने पूर्ण तयारी आणि आत्मविश्वासाने ही परीक्षा दिली अन् साहजिकच यश तिच्या हाती आलं. या परीक्षेत तिने संपूर्ण भारतातून 87 वा क्रमांक पटकावला आहे.
अशी होती अभ्यासाची रणनिती
मुस्कान अभ्यासा दरम्यान जेव्हा खरोखर आवश्यक (UPSC Success Story) असेल तेव्हाच फोन आणि सोशल मीडियाचा वापर करत असे. तिच्या UPSCच्या तयारी धोरणात अभ्यासातील सातत्य हा एक महत्त्वाचा घटक होता. तिने सराव प्रश्नपत्रिका सोडवण्यावर विशेष भर दिला. मुलाखतीची तयारी करताना समतोल आणि प्रामाणिक वर्तन ठेवण्याचा तिने प्रयत्न केला. तिला आत्मविश्वास होता की ती पहिल्याच प्रयत्नात यश मिळवू शकते.
अभ्यासासाठी मुस्कानने ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारचे मार्गदर्शन घेतल्याचे संगते. पण सेल्फ स्टडीवर तिचा जास्त भर होता. हे करताना तिने आठवड्याचे वेळापत्रक तयार केले. याचे काटेकोर पालन करत ती अभ्यासाठी दररोज अंदाजे 7 ते 8 तास वेळ द्यायची.
अधिक माहितीसाठी पहा – https://careernama.com